लातूर : राज्यात लातुर हा सोयाबीन उत्पादक अग्रेसर जिल्हा आहे. मागील काळात देशातील पोल्ट्री व्यावसायिकांनी लॉबी करून सोयाबीन पेंड आयातीला परवानगी मिळवली असताना यास मुदत वाढ द्यावी अशी मागणी केली होती. आता यास पूर्णविराम मिळाला आहे. खुद्द वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे

देशात महाराष्ट्र सोयाबीन उत्पादनात अग्रेसर आहे. पोल्ट्री व्यावसायिकांनी कोंबड्याच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे. म्हणून लॉबिंग करून १२ लाख मेट्रिक टन सोया पेंडीच्या आयतीचा निर्णय घेतला होता. त्यापैकी साडे सहा लाख मेट्रिक टन सोया पेंड आयात झाली आहे. उर्वरित सोया पेंड आयात करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी मागील काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती.

Omicron Symptoms: ओमिक्रॉन बाधितांमध्ये मुलांची संख्या अधिक; दिसताहेत ‘ही’ गंभीर लक्षणे
शेतकरी नेते पाशा पटेल यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना भेट घेऊन पोल्ट्री व्यावसायिकांची मागणी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान याची सविस्तर माहिती दिली. यावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सोया पेंडीच्या आयातीचा केंद्राचा विचार नाही असं ट्विट केल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here