हायलाइट्स:

  • दापोली, मंडणगड नगरपंचायतीत शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी
  • अनिल परब यांच्याकडून सूर्यकांत दळवी समर्थकांना बळ, रामदास कदम यांना धक्का
  • स्वबळावर लढण्याच्या तयारीत असलेल्या काही कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

प्रसाद रानडे | दापोली: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड नगरपंचायत निवडणुकीतील राजकीय समीकरणे वेगाने बदलली आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली आहे. शिवसेनेने या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर दिली असून, येथील माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या कार्यालयातून संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांनी मंगळवारी एबी फॉर्मचे वाटप केले. रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम हे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत, मात्र त्यांना डावलून हे एबी फॉर्म देण्यात आले आहेत. अनिल परब यांनी रामदास कदम यांना हा एकप्रकारे मोठा धक्का दिल्याचं मानलं जात आहे.

गेली पाच वर्षे शिवसेना व काँग्रेस दापोलीत सत्तेत होती. शिवसेनेकडे नगराध्यक्षपद होते. मात्र या निवडणुकीत थेट राष्ट्रवादीशी आघाडी करून तब्बल नऊ जागा राष्ट्रवादी व आठ जागा शिवसेना व सत्तेत पहिली अडीच वर्षे राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष व नंतर अडीच वर्षे शिवसेनेचा नगराध्यक्ष असा ‘तह’ शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादीसोबत केल्याचं कळतं. याचाच परिणाम म्हणून आज राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश देत दोघांना शिवसेनेकडून उमेदवारीही देण्यात आली आहे. शिवसेनेत रामदास कदम यांची विधान परिषद निवडणुकीची उमदेवारी डावलल्यानंतर मंडणगड आणि दापोलीतील निवडणुकीची जबाबदारी अनिल परब यांच्याकडे देणे हा रामदास कदम यांच्यासाठी धक्का मानला जातो. रामदास कदम यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Prajakt Tanpure was questioned by the ED: आघाडी सरकारला आणखी एक धक्का; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ईडी चौकशीच्या फेऱ्यात
राज्यात ४०० जागांवरील निवडणुका अडचणीत; मुंबई, पुण्यासह महापालिका निवडणुकांवरही परिणाम

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड या दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. या दोन्ही नगरपंचायतीच्या प्रत्येकी १३ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. चार जागा ओबीसी प्रवर्गातील असल्याने तेथे निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने दहा दिवसांपूर्वीच स्वबळाची घोषणा केली होती. दरम्यान शिवसेनेने काँग्रेसला बरोबर घेण्याची तयारी करून दापोली-मंडणगड नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जवळपास निश्चित केली होती; मात्र ही सगळी राजकीय समीकरणे ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीत बदलली आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वबळावर लढण्याच्या तयारीत असलेल्या काही सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी तर काँग्रेस, भाजप, मनसे व अपक्ष उमेदवार यांच्यात लढत होणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. भाजप, कॉंग्रेस व मनसे यांनीही स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे.

तुर्भे एमआयडीसीत BMW वर्कशॉपला आग, ४०-४५ कार आगीच्या भक्ष्यस्थानी

Pune : पुण्यातले २० नगरसेवक नाराज असल्याची चर्चा; काय म्हणाले राणे?

दापोली नगरपंचायत निवडणूक होणार लक्षवेधी

रत्नागिरी जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या दापोली नगरपंचायत निवडणुकीत एकूण ७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ओबीसी जागांवर चार ठिकाणी निवडणूक स्थगित झाल्याने १३ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. शिवसेनेकडून एबी फॉर्म हे आमदार योगेश कदम यांच्याकडे न जाता संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या कार्यालयातून दिले आहेत. दापोलीत शिवसेना व राष्ट्रवादी अशी आघाडी निश्चित झाली आहे. यावेळी होणारी निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here