औरंगाबाद : मोठ-मोठ्या हॉलमध्ये होणाऱ्या प्रतिष्ठित कुटुंबातील लग्नसमारंभात हजर राहून हातोहात सोने, हिरेजडित दागिने लंपास करणारी टोळी औरंगाबाद शहरात सक्रिय असल्याचं समोर आलं आहे. गेल्या सात दिवसात अशा दोन घटना घडल्या असून, पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष सीसीटीव्हीत कैद झालेल्या व्हिडीओत चोरी करणारा व्यक्ती एक अल्पवयीन मुलगा असल्याचं सुद्धा समोर आलं आहे.

सोमवारी औरंगाबादच्या बीड बायपास रोडवरील सूर्या लॉन्समध्ये नागपूर येथील सुनील जैस्वाल यांच्या मुलाचं शहरात राहणाऱ्या एका मुलीसोबत लग्न होते. त्यामुळे गेल्या दोन -तीन दिवसांपासून लग्नाची तयारी सुरू होती. तर सोमवारी संध्याकाळी आठ वाजेच्या दरम्यान संगीत रजनीचा कार्यक्रम सुरू होता. तर रात्री ११ वाजता कार्यक्रम संपत असतानाच वराच्या आईला स्वतः जवळ ठेवलेली दागिन्यांची बॅग दिसत नसल्याचं लक्षात आलं. सर्वत्र शोध घेऊन ही बॅग सापडली नसल्याने अखेर चिखलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

धक्कादायक! पोलिसांनी वडिलांच्या डोळ्यांदेखत मुलाला केली अटक; तेवढ्यात काळजात धडकी भरली अन्…

पोलिसांनी लॉन्समधील सीसीटीव्ही फुटेज आणि लग्नातील शूटिंग तपासले असता एका अल्पवयीन मुलगा दागिन्यांची बॅग घेऊन फरार झाला असल्याचे दिसून आले. तर बाहेर चारचाकी गाडी घेऊन उभा असलेल्या त्याचा साथीदारासोबत दोघेही बॅग घेऊन फरार झाल्याचं समोर आलं आहे.

शहरात टोळी सक्रिय…

प्रतिष्ठित लोकांच्या लग्नात चांगले कपडे घालून उपस्थित राहत, स्वतः पाहुणे असल्यासारखं भासवत या टोळीतील लोकं आधी पाहणी करतात. त्यानंतर संधी मिळताच दागिने घेऊन फरार होतात. गेल्या आठ दिवसात शहारत आशा दोन घटना घडल्या असल्याने शहारात आशा चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याची चर्चा आहे.

पुणे पुन्हा हादरले! बर्थ-डे पार्टीला बोलावून २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here