बुलडाणा : पंढरपुर येथून देवदर्शन करून घराकडे परत येणाऱ्या भाविकांच्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वाहन रस्त्यातच उलटल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील चिखली – देऊळगावराजा मार्गावरील मेरा चौकी फाट्याजवळ घडली. काल ७ डिसेंबरच्या सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ३८ भाविक जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्याच्या खांडवीसह परिसराच्या गावातील ४८ भाविक हे पंढरपुर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून ते चिखली मार्गे आपल्या गावी खांडवीकडे मेटॅडोरने जात होते. दरम्यान, चिखली तालुक्यातील मेरा चौकी फाट्याजवळ येताच चालकाला डुलकी लागली आणि वाहनावरील नियत्रंण सुटल्यामुळे मेटॅडोअर रस्त्यातच उलटला.

औरंगाबाद बोर्डात शिकत आहात?, ५ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
अपघात घडताच भाविक महिलांनी एकच आरडओरडा करण्यास सुरूवात केली. या अपघातात सखुबाई गजानन सोनोने, कन्यावती रामेश्वर गायकवाड, ज्ञानेश्वरी सारंगधर इंगळे, सुरेखा विनय महाजन, ताई श्रीकृष्ण धोरण, दशरथ शालीग्राम वाकोडकर, गजानन मधुकर तायडे, अर्चना गजानन तायडे, शारदा विकास गणेशे, त्रिगुणा हरिचंद्र काटे, मनिषा संतोष काटे, गिता शिवाजी काटे, पंचफुला विठ्ठल यादगिरे, पुष्पा यादगीरे, सुशिला थोरात, कुसूम खारोडे, केसर वरजे, अशोक महाले यांच्यासह ३८ भाविक जखमी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here