हायलाइट्स:

  • करोनाचा ओमिक्रॉन व्हेरियंट ५० देशांत दाखल
  • अमेरिकेच्या चिंतेत भर
  • अमेरिकेत ९९ टक्क्यांहून अधिक ‘डेल्टा’ रुग्णांची नोंद

वॉशिंग्टन, अमेरिका :

सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला करोना व्हेरियंटओमिक्रॉन‘ आता तब्बल ५० देशांत दाखल झालाय. अमेरिकेचे ‘रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रा’चे संचालक रोशेल व्हॅलेन्स्की यांनी ही माहिती दिलीय. मंगळवारी, करोना संदर्भात माहिती देण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कोरोनाचा सुपर म्युटंट स्ट्रेन / व्हेरियंट ‘ओमिक्रॉन’ अमेरिकेच्या जवळफास १९ राज्यांमध्ये आढळून आला आहे. अमेरिकेत सध्या प्रत्येक दिवसाला जवळपास लाखभर रुग्ण समोर येत असल्याचं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं.

US China: मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा आरोप; अमेरिकेचा चीनला जोरदार धक्का
Omicron Community Spread: सावध व्हा! ब्रिटनमध्ये ‘ओमिक्रॉन’चा सामूहिक संसर्ग; २४ तासांत ९० रुग्ण
९९ टक्क्यांहून अधिक ‘डेल्टा‘ रुग्ण

सध्या मीडियात ‘ओमिक्रॉन’ची अधिकाधिक चर्चा दिसून येतेय. मात्र, युनायटेड स्टेटसमध्ये आढळून आलेले ९९ टक्क्यांहून अधिक रुग्ण डेल्टा व्हेरियंटनं संक्रमित आढळून आले आहेत हे मी नमूद करू इच्छितो, असा धक्कादायक खुलासाही व्हॅलेन्स्की यांनी केलाय.

ओमिक्रॉनचं मूल्यांकन करणं, त्याचा धोका ओळखण्याचं काम सुरू आहे तसंच या नव्या व्हेरियंटवर करोना लशी किती परिणामकारक ठरू शकतात, याचाही अभ्यास केला जात असल्यांच त्यांनी म्हटलंय.

डॉ. फाऊची यांचा इशारा

व्हाईट हाऊस‘चे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाऊची यांच्या म्हणण्यानुसार, पुढील आठवड्याच्या मध्यापर्यंत शास्त्रज्ञांच्या हाती काही नवीन डाटा लागू शकेल. त्यावरून सद्य वापरात असलेल्या लशी ओमिक्रॉनशी दोन हात करण्यासाठी सक्षम आहेत, हे लक्षात येऊ शकेल.

‘एपिडेमियोलॉजिकल अँड क्लिनिकल’ अभ्यासातील ‘वास्तविक-जागतिक पुरावे’ याबद्दल अधिक स्पष्टता देऊ शकतील. त्यानंतरच ओमिक्रॉन हे विषाणूचं स्वरुप किती संसर्गजन्य आणि गंभीर आहे तसंच लशी त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी प्रभावी आहेत की नाही, याचं उत्तर आपण देऊ शकू, असंही त्यांनी म्हटलंय.

Pakistan: दह्याची आली हुकी… चालकानं स्टेशन अगोदरच थांबवली रेल्वे!
China Population: जोडप्यांनी तिसऱ्या अपत्यालाही जन्म द्यावा, चीन सरकारची इच्छा
नवीन वर्ष… नवा नियम; UAE कर्मचाऱ्यांना दोन दिवसांपेक्षा मोठा ‘वीक ऑफ’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here