| महाराष्ट्र टाईम्स डॉट कॉम | अपडेट केले: डिसेंबर ८, २०२१, रात्री ८:५२

मुंबईतील एनसीपीएच्या शेवटच्या बसस्टॉपवर उभी असलेल्या एका बेस्ट बसमध्ये संशयास्पद बॅग आढळली आहे. या बॅगेची आणि बसची तपासणी करण्यात येत आहे. विधानभवन परिसरातील हा भाग असल्याने पोलिस सतर्क झाले आहेत.

फाइल फोटो

विधानभवन परिसरात मोठी खळबळ; बेस्ट बसमध्ये आढळली संशयास्पद बॅग

हायलाइट्स:

  • एनसीपीए बस स्टॉपव एका बसमध्ये संशयास्पद बॅग.
  • या घटनेमुळे परिसरात खळबळ.
  • बॅग आणि बसची तपासणी सुरू करण्यात आली.

मुंबई : विधानभवन परिसरात एका बसमध्ये एक संशयास्पद बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे. एनसीपीएचे शेवटच्या बसस्टॉपवर उभी असलेल्या बसमध्ये हीबॅग आढळली आहे. बॉम्बरोधक पथक दाखल झाले असून या बॅगेची तपासणी केली जात आहे. (एक संशयास्पद बॅग मध्ये सापडले आहे बेस्ट बस येथे एनसीपीए मध्ये विधानभवन परिसर)

विधानभवन परिसर हा भाग अतिशय संवेदनशील समजला जातो. या भागात राज्याचे विधान भवन आहे. तसेच बाजूलाच संपूर्ण राज्याचा कारभार जेथून पाहिला जातो ते मंत्रालयही यात भागात आहे. अशा भागात एका बेस्ट बसमध्ये संशयास्पद बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसही सतर्क झाले असून या बसची आणि बॅगची तपासणी करण्यात येत आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: विधानभवन परिसरात एनसीपीएच्या बेस्ट बसमध्ये संशयास्पद बॅग सापडली आहे
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here