हायलाइट्स:

  • संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांचे निधन.
  • तामिळनाडूतील रुग्णालयात झाला मृत्यू.
  • हेलिकॉप्टर दुर्घटनेत झाले होते गंभीर जखमी.

मुंबई- दुपारपासून भारतीय या बातमीने चिंतेत होते आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रार्थना करत होते. CDS जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि इतर लष्करी अधिकारी सुरक्षित असावे यासाठी ते क्षणोक्षणी अपडेट्स घेत होते. तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघाताची बातमी येताच दिल्लीत खळबळ उडाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सारेच प्रत्येक क्षणाचे अपडेट्स घेत होते. मात्र संध्याकाळी ज्या बातम्या देशवासीयांना ऐकायच्या नव्हत्या, त्याच बातम्या समोर आल्या.

CDS बिपीन रावत यांच्या मृत्यूवर पोट धरून हसत आहेत लोक

देशाने शूर योद्धा, सीडीएस जनरल बिपीन रावत यांना गमावलं. संध्याकाळी ६ च्या सुमारास सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नीसह १३ जणांच्या मृत्यूची बातमी आली. तामिळनाडूतील कुन्नूरजवळ बुधवारी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळल्याची बातमी आली. थोड्यावेळात त्यात बिपीन रावत आणि त्यांची पत्नी असल्याचं उघड झालं. ही बातमी कळल्यानंतर अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढतात. भारतीय ते सुखरूप असावेत यासाठी प्रार्थना करू लागतात. सुरुवातीला या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी येते आणि हळूहळू या अपघातातील मृतांची संख्या वाढत जाते.

जनरल बिपीन रावत

या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह १४ जण होते. दुपारी १२ नंतर या हेलिकॉप्टरच्या अपघाताची बातमी येते आणि संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांनी हेलिकॉप्टरमधील बिपीन रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी येते. बुधवारी सकाळी जेव्हा ते दिल्लीहून निघाले तेव्हा कोणाला माहीत होतं की ते कधीच परतणार नाहीत.

CDS जनरल बिपीन रावत यांचं चीनसाठीचं ‘ते’ शेवटचं विधान

सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी आज म्हणजेच बुधवारी सकाळी ८ वाजून ४७ मिनिटाला हवाई दलाच्या विशेष विमानाने दिल्ली सोडले आणि ११ वाजून ३४ मिनिटाला ते सुलूर येथे पोहोचले. सुलुर येथून ते सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांनी एमआय-१७ मधून वेलिंग्टनला रवाना झाले. तिथे स्टाफ कॉलेजमध्ये त्यांचे व्याख्यान होणार होते. मात्र १२ वाजून २२ वाजता अपघातानंतर ते बेपत्ता झाल्याचा अहवाल आला आणि संध्याकाळी ६ च्या सुमारास हेलिकॉप्टर अपघातात जनरल रावत आणि त्यांची पत्नी यांच्या मृत्यू झाल्याची बातमी समोर आली.

जनरल बिपीन रावत

हेलिकॉप्टर अपघातासंदर्भात बुधवारी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सीसीएसची बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. या बैठकीत पंतप्रधान मोदींशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित होते. या संपूर्ण घटनेची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गुरुवारी सभागृहात देणार आहेत.

संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन

हेलिकॉप्टरमध्ये जनरल रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल.एस. लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नाईक गुरसेवक सिंग, नाईक जितेंद्र कुमार, नाईक विवेक कुमार, नाईक बी. साई तेजा, हवालदार सतपाल आणि पायलट विमानात होते. हेलिकॉप्टर अपघातात जखमी झालेले भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. २०२० मध्ये हवाई आणीबाणीच्या वेळी त्यांच्या LCA तेजस लढाऊ विमानाची सुटका केल्याबद्दल त्यांना या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here