: शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवरील अतिक्रमणासह वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या हातगाडीधारकांवरही बुधवारी पोलिसांनी कारवाई केली. यापूर्वी पोलिसांनी आग्रा रोडवरील व्यापारी आणि हातगाडीधारकांना रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याची लेखी सूचना केली होती. त्यानंतरही रस्त्यावरील न हटवल्याने बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. ()

पुन्हा अतिक्रमणे केल्यास दंडात्मक नाही तर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांनी दिला आहे.

पोलीस उपअधीक्षक दिनकर पिंगळे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख, आझाद नगरचे निरीक्षक आनंद कोकरे, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक धीरज महाजन, निरीक्षक संगिता राऊत यांच्यासह पोलिसांनी बुधवारी मोठा फौजफाटा घेत आग्रा रोडवरील व्यापार्‍यांची अतिक्रमणे आणि हातगाडी धारकांना रस्ता मोकळा करण्याच्या सूचना केल्या. तसंच काही व्यापार्‍यांनी केलेली तात्पुरते अतिक्रमणे काढली.

दरम्यान, या कारवाईमुळे रस्त्यावरील सर्व अडथळे दूर झाल्याने आग्रा रोड वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा झाला. तसंच पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण केल्यास किंवा रस्त्यात हातगाड्या लावल्यास फौजदारी करवाईचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here