२०१८ मध्ये रावत आलेले गावी
जनरल बिपीन रावत यांचे काका भरत सिंह रावत यांनी सांगितले की, ते काही कामानिमित्त कोटद्वार मार्केटमध्ये गेले होते, मात्र अपघाताची माहिती मिळताच ते घरी परतले. त्यांनी सांगितले की आजूबाजूच्या गावातील काही लोक त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी आले आहेत आणि सर्वांच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्यांच्या ७० वर्षीय काकांनी सांगितले की एप्रिल २०१८ मध्ये लष्कर प्रमुख झाल्यानंतर ते शेवटचे त्यांच्या गावी आले होते आणि काही वेळ घरात घालवून त्याच दिवशी परतले. यावेळी त्यांनी कूलदेवतेची पूजाही केली.

गावच्या दऱ्या खोऱ्यात रहायचे होते
जनरल रावत यांच्या काकांनी सांगितले की त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर घर बांधण्याचा विचार केला होता आणि जानेवारीमध्ये निवृत्त झाल्यानंतर ते येथे घर बांधून गावातील शांत दऱ्याखोऱ्यात काही काळ घालवणार असल्याचं सांगितलं होतं. भरतसिंह म्हणाले की बिपीन गरीबांवर खूप दयाळू होता आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना आपल्या भागातील गरिबांना आर्थिक बळ मिळवून देण्यासाठी काहीतरी करायचे होते. ग्रामीण भागातून होणाऱ्या स्थलांतराबद्दल जनरल रावत यांच्या मनातही दु:ख होते.
CDS बिपीन रावत यांच्या मृत्यूवर पोट धरून हसत आहेत लोक

काकांना सांगितलेला योजना
जनरल बिपीन रावत हे आपल्या गावाशी आणि घराशी खूप जोडलेले होते आणि ते वेळोवेळी काकांशी फोनवर बोलत असत. जनरल रावत यांनी आपल्या काकांना सांगितले होते की ते एप्रिल २०२२ मध्ये गावी परत येतील. डोळ्यातील अश्रू पुसत ते म्हणाला की मला काय माहीत होतं पुतण्याची स्वप्नं अधुरी राहतील.’