औरंगाबाद : औरंगाबाद इथं एक धक्कादायक घटना समोर आली असून मोबाईलसाठी मामा भावाने आत्या भावाचा विहिरीत ढकलून आणि नंतर डोक्यात दगड घालून खून केल्याची मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. आजोबांनी आपल्या आत्या भावाला दिलेला मोबाईल आपल्याला मिळावा म्हणून १७ वर्षीय मामा भावाने हे कृत्य केल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैठण एमआयडिसी पोलीस ठाणे हद्दीत ३ डिसेंबर रोजी ढोरकिन-बालनागर रोडवरील एका विहिरीत अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी अधिक तपास केला असता या प्रकरणी वाळूज पोलीस स्टेशनला २ डिसेंबर रोजी तक्रार दाखल करण्यात आल्याचं लक्षात आलं. त्यामुळे मयताची ओळख पटवली असता वाळूजजवळ असलेल्या शेंदूरवादा गावातील अंकुश प्रल्हाद म्हैसमाळे या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृतदेह असल्याचं स्पष्ट झालं.

भाजप नेत्याला मारहाण करणं शिवसेनेला भोवलं, मंत्र्याच्या भावासह पुतण्याविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असता हा खून मयताच्या मामा भावानेच केला असल्याचं समोर आलं. आजोबांनी दिलेला मोबाईल आपल्याला मिळावा म्हणून अल्पवयीन आरोपीने आपल्या मामा भावाला फिरायला नेण्याचा बहाणा करून त्याचा खून केल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी आता वाळूज पोलीस पुढील तपास करत आहे.

असा रचला कट…

मयत तरुण आणि आरोपी दोन्ही आत्या-मामा भाऊ असून दोघेही १७ वर्षांचे आहेत. तर मयत तरुणाला त्याच्या आजोबांनी मोबाईल घेऊन दिला होता आणि तोच मोबाईल आरोपी अल्पवयीन मुलाला हवा होता. त्यासाठी त्याने कट रचला आणि आत्या भावाला बिर्याणी आणि दारू पाजतो म्हणून पैठण तालुक्यातील बिडकीन गावात घेऊन गेला. तिथे बिर्याणी आणि दारू घेतनंतर बालानगर रोडवर असलेल्या एका विहिरीवर थांबून बिर्याणी खाल्ली. याचवेळी आरोपीने तुझे फोटो काढतो म्हणून आत्या भावाला विहिरीच्या काठावर उभं केलं आणि ढकलून दिलं. त्यानंतर ही आत्या भाऊ वरती येत असल्याचे पाहून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. भाऊ मयत झाल्याची खात्री होताच तेथून अल्पवयीन आरोपीने पळ काढला.

मराठवाड्याला हक्काचे पाणी कधी मिळणार! ११ वर्षात फक्त ६०% काम झालं, खर्चाचा आकडा वाचून हादराल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here