नागपूर: भूत दिसत आहे. तो मला घेऊन जाईल, असा भास होत असल्याने ३० वर्षीय युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना सोमवारी सकाळी नरसाळा मार्गावरील महाविष्णूनगर भागात घडली. रोशन नरहरी उंबरकर असे मृताचे नाव आहे.

गेल्या चार दिवसांपासून रोशन याला भूत दिसत असल्याचा भास होत होता. तो सोबत घेऊन जाईल, अशी भीती त्याला होती. सोमवारी पहाटे ४ वाजता तो झोपेतून उठला. नातेवाइकांनी त्याला हटकले. तो घराबाहेर गेला. त्यानंतर तो परतलाच नाही. नातेवाइकांनी शोध घेतला. घराजवळील विहिरीत त्याचा मृतदेह आढळला. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

गळफास घेऊन दोघांची आत्महत्या

तकिया धंतोली येथे सोमवारी सकाळी धनंजय बगडू अहीर (वय ३५) याने पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. तर दुसरी घटना नंदनवनमधील हिवरी ले-आऊट येथे घडली. प्रकाश विठ्ठलराव बोकडे (वय ४२) यांनी पंख्याला बांधलेल्या शालच्या साह्यानं गळफास घेतला. या दोन्ही घटनांची नोंद पोलिसांनी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here