हिंगोली : जिल्ह्यात कोरडवाहू तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, खरिपातील सर्वच पिकांना यंदा पेरणीपासूनच धोका राहिलेला आहे. त्यामुळे सोयाबीन आणि उडदाच्या उत्पादनात घट झालीच आहे पण आता अंतिम टप्प्यात असलेल्या तुरीलाही पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा फटका बसला आहे. बदलत्या वातावरणामुळे तुरीवर मररोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. महागडी औषधे फवारणी करूनही शेतकऱ्यांकडे पर्यायच उरलेला नाही.

तूर हे खरिपातील शेवटचे पीक आहे. मध्यंतरीच्या अतिवृष्टीचा या पिकावर परिणाम झाला नव्हता पण सध्या हे पिक शेंगा च्या पक्व अवस्थेत आहे. यातच मररोगाचे प्रमाण वाढत असल्याने याचा थेट परिणाम हा उत्पादनावर होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग आहेत. हिंगोली जिल्ह्यात अंदाजे ८० हजार हेक्टर वर तूर पिकाचा पेरा आहे. जवळपास ७० टक्के जमीन क्षेत्रावरील तूर वाळून गेली आहे. पक्व होत असलेल्या शेंगा गळून जात आहेत, परिणामी सेंगातील सोले ज्वारीच्या दाण्यासारखे बारीक झालेले बघायला मिळतात. या सर्वांचा परिणाम हा उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे यंदा तुरीचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जाते.

मामेभाऊ जीवावर उठला, फोटो काढण्यासाठी विहिरीकाठी उभं केलं अन् ढकलून दिलं, कट ऐकून पोलिसही चक्रावले!
लागोपाठ येणारी संकटाची मालिका शेतकऱ्यांचा पाठलाग सोडत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. उत्पादनामध्ये झालेली घट आणि लागवडसाठी लागलेला खर्च कसा फेडायचा, सवकाराचं घेतलेले कर्ज कसं फेडायचं या विवंचनेने शेतकरी त्रस्त झाला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचं टोकाचं पाऊल, संपानंतर बसची पहिली फेरी मारलेल्या चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here