जालना : जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे पोलिसांनी जादूटोणा करून गुप्तधन काढण्याचा प्रयोग करणाऱ्या टोळीतील तिघांना जेरबंद केलं असून अजून ३ जण फरार झाले आहेत. बदनापूर शहरातील कुंभार गल्लीतील एका जुन्या वाड्यात हा गुप्तधन काढण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहिती वरून पोलीस सदरील ठिकाणी छापा टाकला आणि त्यानंतर भलताच प्रकार समोर आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ सुरू असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी आरोपी धर्मदास गोपल दास वय ४५ वर्ष रा. पारोड पालघर, विजय फुलचंद सहाने वय ४६ वर्ष रा. मिनार ता, भिवंडी, उत्तम विठ्ठल दाभाडे वय २९ वर्ष जावेद खाँन महेबुब खाँन, साजिद खान, फिरोज पठाण हे दि ०८/१२/२०२१ रोजी मध्यरात्री ०२.३० वाजता बदनापुर शहरातील गुलजार मस्जीदजवळ कुंभार गल्ली येथील फिरोज पठाण यांच्या पडित वाड्यामध्ये पूजा करत होते.

कोण पेटवतंय एसटी आंदोलन? आगारातून एसटी सुटली म्हणून धावत्या बसवर दगडफेक, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
या पूजेसाठी एक पितळी तांब्या, चार नारळ, हळद कुंकू लावलेले एक लिंबू व एक लालसर रंगाचे कापड, लोखंडी टिकास, माती उकरण्यासाठीचे लोखंडी फावडे, दोन प्लास्टीकचे टोपले आणून ठेवलेले होते. या पडीक वाड्यात जादुटोना करून गुप्तधन काढण्याच्या लालचेपोटी पुजापाठ मांडून मंत्र उच्चार करुन जमीनीवर खोदकाम करतांना हे ६ जण पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी छापा मारून ३ जणांना ताब्यात घेतले. पण इतर ३ आरोपी हे पोलीसांना पाहून पळून गेले.

फरार झालेल्या तिघांचा शोध सुरू असून पोलिसांनी या प्रकरणी पोलिसांनी ४२६/२०२१ कलम ३(२) महाराष्ट्र नरबळी व ईतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोना यांना प्रतिबंध व समुळ उच्चाटन अधिनियम २०१३ कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी बदनापूर पोलीस अधिक तपास करत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचं टोकाचं पाऊल, संपानंतर बसची पहिली फेरी मारलेल्या चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here