लाहोर, पाकिस्तान :

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून एक धक्कादायक आणि तितकीच लाजिरवाणी घटना समोर येतेय. एका दुकानातून चोरी केल्याचा आरोप ठेवत एका किशोरवयीन मुलीसहीत चार महिलांची निर्वस्त्र धिंड काढण्यात आल्याची घटना इथे घडलीय. इतकंच नाही तर या महिलांना जमावाकडून बेदम मारहाणही करण्यात आलीय.

सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या महिला उपस्थितांकडे आपल्या शरीर झाकडण्यासाठी कपडे देण्याची विनवण्या करत राहिल्या… परंतु, नराधमांना त्यांची दया आली नाही. रस्त्यावर नग्नावस्थेत या महिलांची धिंड आढण्यात आली.

दिवसाढवळ्या जवळपास तासभर हा प्रकार सुरू होता. सोशल मीडियावरून व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पंजाब पोलिसांना जाग आली.
VIDEO: पाकिस्तानात श्रीलंकन नागरिकाला जिवंत पेटवणाऱ्याची कॅमेऱ्यासमोर गर्वानं कबुली
श्रीलंकन व्यक्तीची क्रूर हत्या : पाकिस्तान संरक्षणमंत्र्यांचं लाजिरवाणं वक्तव्य
या दुर्दैवी घटनेसंदर्भात पाच जणांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पंजाब पोलिसांच्या एका प्रवक्त्यानं दिली आहे.

कायद्यातील तरतुदींनुसार पाच संशयित आणि इतर काही आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

फैसलाबाद इथल्या बावा चक बाजारात आपण कचरा उचलण्यासाठी गेलो होतो, असा दावा पीडित महिलांनी केला आहे.

Sialkot lynching: ‘पाकिस्तान म्हणजे काही भारत नाही’, पाक मंत्र्यांनं नाहक भारतालाही वादात ओढलंBangladesh: विद्यार्थ्याची जमावाकडून हत्या; २० दोषी विद्यार्थ्यांना फाशीची शिक्षा
तहान लागल्यानं आम्ही ‘उस्मान इलेक्ट्रिक स्टोअर’मध्ये जाऊन पाण्याची बाटली मागितली. परंतु, दुकानाचा मालक सद्दाम यानं आमच्यावर चोरीच्या उद्देशानं दुकानात प्रवेश केल्याचा आरोप केला. सद्दामसहीत काही जणांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. ते इथवरच थांबले नाहीत तर त्यांनी निर्वस्त्र करून आमचे काही व्हिडिओही काढले. हा प्रकार सुरू असताना गर्दीतल्या कुणीही त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही, अशी खंतही या महिलांनी व्यक्त केली.

CDS बिपीन रावत यांच्या अपघाती निधनानं भारतासहीत पाकिस्तान लष्करही हळहळलं!
CDS Death: जनरल रावत – पाक जनरल बाजवांनी सोबत हाताळलं होतं ‘मिशन’; निधनावर शोक व्यक्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here