हायलाइट्स:

  • उल्हासनगरमध्ये वाढले चोऱ्यांचे प्रमाण
  • दोन दुचाकींची एकाच दिवशी चोरी, चोरटे सीसीटीव्हीत कैद
  • चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे पोलिसांसमोर आव्हान
  • विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

उल्हासनगर : गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगरातील विविध भागांत चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. आता चोरट्यांनी आपला मोर्चा दुचाकींकडे वळवला असल्याचे दिसून येते. येथील कॅम्प नंबर चारमधील पाच दुकान परिसरातून एकाच दिवशी दोन दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आल्या आहेत. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प नंबर चारमधील पाच दुकान भागात एकाच दिवशी दोन दुचाकी चोरट्यांनी पळवल्या. दुचाकी चोरून नेताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Mumbai Crime : शेजाऱ्यानं घरी लावलेल्या स्पीकरच्या आवाजानं डोकं फिरलं; संतापाच्या भरात तरूण धावला अन्…
मसाज पार्लरमध्ये सुरू होता धक्कादायक प्रकार, नवी मुंबईचे पोलीस पोहोचले अन्…

उल्हासनगरमध्ये सध्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यापूर्वीही अनेक घटना उघड झाल्या आहेत. पार्किंगमध्ये उभ्या करून ठेवलेल्या कारचे बोनट आणि नंबर प्लेट लंपास केल्याची घटना घडली होती. त्यानंतर एका कारच्या दरवाजाची समोरील काच फोडून कारमधील पाच लाख रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केल्याची घटनाही उल्हासनगर शहरात घडली होती. तसेच कपडे दाखवण्यात गुंतवून दोन चोरट्यांनी मोबाइल आणि हेडफोन लंपास केल्याची घटनाही उघड झाली होती. दुसरीकडे उल्हासनगरमध्ये एका व्यापाऱ्याच्या दुकानातील पैशांची बॅग आणि महत्त्वाची कागदपत्रेही घेऊन चोरट्यांनी पोबारा केला होता. विविध भागांत चोरीच्या घटना घडत असताना, आता कॅम्प नंबर चारमधून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. दुचाकी चोरून नेताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, विठ्ठलवाडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. दुसरीकडे या चोरीच्या घटना वाढलेल्या असताना, चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. तर उल्हासनगर शहरात चाललंय तरी काय, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

Navi Mumbai crime : पहाटेच्या वेळी कंपनीचे शटर तोडले, चोरट्यांनी जे हाताला लागेल ते…
Diva Accident : तिघे जण दुचाकीवरून आले, इतक्यात बाजूनेच ट्रक गेला अन्…अंगाचा थरकाप उडवणारी घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here