या घटनेतील तक्रारदार छाया सकपाळ (३२) या तुर्भे सेक्टर-२२मधील रेखा स्मृती इमारतीत पहिल्या मजल्यावर कुटुंबासह राहण्यास आहेत. ४ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास छायाचे पती कामावर निघून गेल्यानंतर त्या स्वयंपाकघरात काम करत होत्या. यावेळी त्यांचा दरवाजा उघडाच असल्याने गोदावरी चोरी करण्यासाठी घरामध्ये घुसली. निर्मला घराबाहेर थांबली. दरवाजाचा आवाज आल्याने छाया बाहेर आल्या.
यावेळी त्यांना कपाटाजवळ गोदावरी दिसली. तिने घरातील तिन्ही मोबाइल फोन चोरल्याचे लक्षात आले. गोदावरीने छायाला पाहून फोन खाली टाकून देत पलायन केले. छाया यांनी तिचा पाठलाग केला असता, निर्मलादेखील पळून जाऊ लागल्याने छाया यांनी आरडoओरड करत त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दोघींना पकडले. त्या भागातील महिलांनी दोघींना चोप देऊन एपीएमसी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानुसार पोलिसांनी दोघींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.