” दरम्यान अनेक नागरिक सूचना धुडकावून लावत रस्त्यावर फिरताना आढळल्यानं आणि महाराष्ट्रात राज्य सरकारनं ‘कर्फ्यू’ लागू केलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही राज्यातील लोकांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं नाही तर लागू करण्यात येईल, अशी ताकीद दिलीय.
देशातील या राज्यांत लॉकडाऊन
देशातील तब्बल ३० संपूर्णत: ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात आला आहे. चंदीगड, दिल्ली, गोवा, जम्मू-काश्मीर, नागालँड, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, लडाख, झारखंड, अरुणाचल प्रदेश, बिहार, त्रिपुरा, तेलंगणा, छत्तीसगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, , आंध्र प्रदेश, मेघालय, मणिपूर, तामिळनाडू, केरळ, हरियाणा, दमण-दीव-दादरा नगर हवेली, पुदुच्चेरी, अंदमान-निकोबार बेट, गुजरात, कर्नाटक, आसाम ही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संपूर्णत: ‘लॉकडाऊन’ करण्यात आली आहेत.
आता, उरली केवळ ६ राज्य / केंद्रशासित प्रदेश
देशातील ५४८ जिल्हे संपूर्णत: लॉकडाऊन करण्यात आलेत. देशात एकूण २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत. अर्थात आता केवळ ६ राज्य / केंद्रशासित प्रदेश असे उरलेत जिथं संपूर्णत: लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला नाही. उत्तर प्रदेशातील १६ जिल्ह्यांत तर मध्य प्रदेश आणि ओडिशानं काही जिल्ह्यांत लॉकडाऊन जाहीर केलाय. लक्षद्वीपनंही काही ठिकाणी बंदी केलीय.
जगभरात १५,००० हून अधिक मृत्यू
जगभरात आत्तापर्यंत करोना व्हायरसमुळे १५ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झालाय. तर जवळपास साडे तीन लाख लोक करोना व्हायरसनं प्रभावित झाले आहेत. देशात सर्वात अगोदर पंजाब राज्यानं संपूर्ण राज्यात ‘कर्फ्यू’ घोषित केला. त्यामागोमाग महाराष्ट्रातही ‘कर्फ्यू’ लावण्यात आलाय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times