हिंगोली : आठवड्यात संभाव्य ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर प्रयोग शाळांमधून जास्तीत जास्त करोना चाचण्या होण्यासाठी तिन शिफ्टमध्ये प्रयोगशाळा याच्या सूचना विभागीय आयुक्त कार्यालयाने दिल्या आहेत. या प्रयोग शाळांमधून दररोज पाच हजार करोना चांचण्या कराव्यात, यामध्ये ७० टक्के चाचण्या आर्टिफिशियार असाव्यात, असेही सांगितल्याचे समजते. संभाव्य धोका लक्षात घेता सर्व जिल्ह्यांना सूचना दिल्याची ही समजते.

सध्याच्या स्थितीत मराठवाड्यात करोना चाचण्या कमी असून या चाचण्यांचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. यामधे दररोज पाच हजार चाचण्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच प्रयोगशाळेत जास्तीत जास्त चाचण्यां होण्यासाठी प्रयोग शाळा तीन शिफ्टमध्ये चालवाव्यात, त्यासाठी पुरेसे साहित्य, तपासणी तिकीट उपलब्ध करून घ्यावेत, या चाचण्यांसाठी विशेष पथके नियुक्त करून गर्दीच्या ठिकाणी तपासणी नाके सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Omicron In Maharashtra: चांगली बातमी! राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ओमिक्रॉनचा एकही नवा रुग्ण नाही
ऑक्सीजनसाठी टँक, पाईप ऑक्सिजन मिटर, याची प्रत्यक्ष तपासणी करावी, नव्याने उभारले जाणारे ऑक्सिजन प्लांट्स तातडीने सुरू होण्यासाठी प्लांट निहाय संपर्क अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नविन विषाणूची घातकता लक्षात घेता बेडचे नियोजन करावे, व्हेंटिलेटर, आयसीयु बेड, नॉन व्हेनटी लेटर बेड याचे नियोजन करावे. पेडियाट्रिक बेडची उपलब्धता तपासावी, संस्थात्मक विलीनीकरण केंद्र पुन्हा सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आले आहेत. मराठवडयात १०० टक्के लसीकरणासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

विदेशातून आलेल्या प्रवाशांसाठी स्वतंत्र नियमावली करावी, मागील पंधरा दिवसातील विशेषत बाधीत देशातून आलेल्या प्रवाशांची माहिती घेऊन त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या बंधनकारक करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यांना १४ दिवसाच्या संस्थात्मक किंवा गृह विलीनीकरण करण्याबाबत निर्णय घ्यावा. या प्रवाशांची माहिती घेऊन त्यांची तपासणी करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचेही सांगण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांची बैठक घेऊन आढावा देखील घेतला आहे.

औरंगाबादकरांनो लसीचा दुसरा डोस लगेच घ्या, अन्यथा ‘या’ तारखेनंतर होणार कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here