औरंगाबाद : आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून, पक्षातील महत्वाचे नेत्यांचे दौरे सुद्धा सुरू झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे पुढील आठवड्यापासून औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मात्र त्यांच्या दौऱ्यापूर्वीच शिवसेनेने मनसेला धक्का देत अनेक मनसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला आहे. (औरंगाबाद राजकीय बातम्या आधीही राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर रवाना शिवसेनेचा मनसेला मोठा धक्का)

राज ठाकरे यांचा दौरा लक्षात घेत आणि हिंदुत्ववादी मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी खेळी करत अनेक मनसेच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला. ज्यात माजी जिल्हा परिषद सदस्य, मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष यांच्यासह अनेक मनसे पदाधिकारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे हा प्रवेश सोहळा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला.

आता ३ शिफ्टमध्ये होणार करोनाच्या चाचण्या, रोज ५ हजार तपासण्या करण्याचं टार्गेट
आगामी महानगरपालिका निवडणूक लक्षात शिवसेना कामाला लागली आहे. तर खुद्द पालकमंत्री सुभाष देसाई निवडणुकीबाबत लक्ष घालून आहे. गुरुवारी झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात ही देसाई यांनी मनसेवर निशाणा साधत, मनसे आता ‘गळकं घर’ झाला असून, शिवसेना चिरेबंदी वाडा’ असल्याचा टोला लगावला आहे.

पुढील आठवड्यात राज ठाकरेंचा दौरा…

आगामी महानगरपालिका निवडणूक लक्षात घेत राज ठाकरे हे पुढील आठवड्यापासून औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहे. त्यांचा दौरा कसा असणार याबाबत आज मनसे पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहे. मात्र शहरातील मनसेची झालेली पडझड पाहता राज ठाकरेंचा दौरा मनसेसाठी किती महत्वपूर्ण ठरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Aurangabad political news Even before Raj Thackeray left for Aurangabad tour ShivSena big blow to MNS)

Omicron In Maharashtra: चांगली बातमी! राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ओमिक्रॉनचा एकही नवा रुग्ण नाही

(Aurangabad Political News राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच शिवसेना मनसेला मोठा धक्का)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here