गोंदिया : राज्यात खळबळजनक घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरीच आत्महत्या केल्याने पूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या नक्षलग्रस्त भागामध्ये पोलीस स्टेशन सालेकसा इथं त्या कार्यरत होत्या. त्यांनी आज राहत्या घरी आत्महत्या केल्यामुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलीस या संदर्भात अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती बघेले असं या पोलीस महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे. ज्योती आणि त्यांचे पती रमेश हे दोघेही सालेकसा इथं पोलीस विभागात काम करतात. ज्योती सालेकसा पोलीस स्टेशनमध्ये तर रमेश सी ६० पथकात कार्यरत आहेत. सकाळी दोघेही आपल्या ड्युटीवर गेले होते. पण यानंतर ज्योती बघेल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पुन्हा आपल्या घरी आल्या.
आता ३ शिफ्टमध्ये होणार करोनाच्या चाचण्या, रोज ५ हजार तपासण्या करण्याचं टार्गेट

यानंतर काही वेळाने त्यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, त्यांनी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल का उचललं यासंबंधी अधिक तपास सुरू असून पोलीस या संदर्भात चौकशी करत आहेत.

राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्याला जाण्याआधीच शिवसेनेचा ‘मनसे’ला मोठा धक्का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here