करोनाच्या उद्रेकाशी संपूर्ण भारत लढत आहे. देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढून ती ४७१ इतकी झाली आहे. ही साथ पसरण्याती गती लक्षात घेत महाराष्ट्रासह दिल्ली, हरयाणा, राजस्थान, पंजाब, चंडीगड, आंध्र प्रदेश आणि झारखंड अशा राज्यांमध्ये घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर देशातील मोठ्या शहरांमध्ये काय परिस्थिती आहे, पाहुयात…

Live अपडेट्स…

>> देशात करोनाबाधितांची संख्या ४७१ वर पोहचलीय. तर करोनामुळे झालेल्या मृत्युंची संख्या ९ वर पोहचली

>> देशातील ३० राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संपूर्णत: ‘लॉकडाऊन’… तसंच ५४८ जिल्हे लॉकडाऊन…. चंदीगड, दिल्ली, गोवा, जम्मू-काश्मीर, नागालँड, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, लडाख, झारखंड, अरुणाचल प्रदेश, बिहार, त्रिपुरा, तेलंगणा, छत्तीसगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मेघालय, मणिपूर, तामिळनाडू, केरळ, हरियाणा, दमण-दीव-दादरा नगर हवेली, पुदुच्चेरी, अंदमान-निकोबार बेट, गुजरात, कर्नाटक, आसाम ही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संपूर्णत: ‘लॉकडाऊन’ करण्यात आली आहेत.

>> करोनाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ३००० कैद्यांची सुटका करण्याचा तिहार तुरंग प्रशासनाचा निर्णय… १५०० कैद्यांना पॅरोलवर तर १५०० कैद्यांची अंतरिम जामिनावर सुटका केली जाईल

>> आज मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत संपूर्ण गुजरात राज्यात लॉकडाऊन घोषित… लॉकडाऊनचं पालन न करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल : शिवानंद झा, डीजीपी गुजरात

>> देशातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ… करोनाबाधितांची एकूण संख्या ४३३ वर

>> करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेनंतर राज्यसभेचं कामकाज स्थगित

>> करोना व्हायरशी दोन हात करणाऱ्या जिगरबाजांप्रती लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष यांच्यासहीत सर्व खासदारांनी कृतज्ञता व्यक्त केली

>> करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेनंतर राज्यसभेचं कामकाज स्थगित

>> रेशनकार्डधारक कुटुंबांना एका महिन्याचं धान्य मोफत दिलं जाईल. पेन्शनधारकांना तीन महिन्यांचं पेन्शन ऍडव्हान्समध्ये दिलं जाईल. ज्या जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आलं आहे त्या जिल्ह्यातील रेशनकार्ड धारक कुटुंबांना १००० रुपये दिले जातील. पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत स्कॉलरशीप दिली जाईल : नितीश कुमार, मुख्यमंत्री, बिहार

>> बिहारच्या सर्व डॉक्टर आणि मेडिकल स्टाफला एका महिन्याचं मूळ वेतन प्रोत्साहन म्हणून दिलं जाईल : नितीश कुमार, मुख्यमंत्री, बिहार

>> केरळ राज्यातही लॉकडाऊनची घोषणा, राज्याच्या सीमा बंद, सार्वजनिक वाहतुकही रोखली

>> करोना स्क्रिनिंग सुविधा वाढवण्यासाठी खासदार विकास निधीचा वापर करा, काँग्रेस खासदार शशी थरूर यांचा केंद्र सरकारला सल्ला

>> लॉकडाऊनचं पालन करा, अन्यथा मंगळवारपासून कडक कारवाई करण्यात येईल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जनतेला ताकीद

>> आसाममध्येही २४ मार्चच्या सायंकाळपासून ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन राहतील : हेमंत बिस्वा शर्मा, आसाम सरकारचे मंत्री

>> नागरिक ‘लॉकडाऊन’ला जुमानत नाहीत, त्यामुळे संपूर्ण राज्यात कर्फ्यू लागू करण्याचे आदेश मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गाड्या जावू शकणार नाहीत.

>> उद्या मध्यरात्रीपासून देशांतर्गत विमान वाहतूक बंद, फक्त कार्गो विमानांची वाहतूक सुरू राहणार, केंद्रीय नागरी उड्डाण संचालनालयाचा (DGCA) निर्णय

>> देशात करोनामुळे ९वा मृत्यू, पश्चिम बंगालमध्ये एका ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू.

>> संसदेतही लॉकडाऊन, लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित

>> बिहार: सर्व पॅसेंजर ट्रेन रद्द करण्यात आल्याने पाटण्यात लोकांनी बसच्या टपांवर बसून केला प्रवास.

>> लॉकडाऊनमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बंद

>> देशातील २२ राज्यांमधील ८० शहरांमध्ये लॉकडाऊन.

>> उदया संध्याकाळी ५ वाजल्यानंतर सुप्रीम कोर्टात कुणालाही प्रवेश मिळणार नाही.

>> सुप्रीम कोर्टात फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच होणार सुनावणी.

>> सुप्रीम कोर्टात आता अत्यंत महत्वाच्या प्रकरणांवरच होणार सुनावणी.

>> देशभरात करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ४१५ वर पोहोचली.

>> देशातील राज्य सरकारांनी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

>> काही लोक लॉकडाऊनला गांभिर्याने घेत नाहीत, कृपया स्वत:ला वाचवा, आपल्या कुटुंबाला वाचवा, सूचनांचे गांभिर्याने पालन करा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जनतेला आवाहन.

>> क्लिक करा आणि वाचा बातमी-

>> क्लिक करा आणि वाचा बातमी-

>> मुंबईत फिलिपीन्सच्या एका ६८ वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू, महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांची संख्या ८९ वर… एकूण ३ मृत्यू

>> दिल्ली पोलिसांनी कलम ५०९ अंतर्गत केला एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. दिल्लीतील विजयनगर भागात मणिपूरमधील एका महिला करोना असे संबोधून तिच्यावर थुंकली होती व्यक्ती.

>> दिल्लीत उबरने आपली सेवा केली बंद.

>> आज सकाळी ६ वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर राजधानी दिल्लीत असे दृश्य होते.

>> रविवारी जनता कर्फ्यूदरम्यान जामा मशीद परिसरात असा सन्नाटा होता.

>> ३१ मार्च पर्यंत लॉकडाऊन घोषित केल्यानंतर आज सकाळी चैन्नई शहरातील परिस्थिती.

>> राजधानी दिल्लीत आज सकाळी ६ वाजल्या पासून ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे.

>> २३-२५ मार्चपर्यंत उत्तर प्रदेशातील १६ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. लॉकडाऊन नंतर प्रयागराजची पहिली सकाळ अशी होती.

>> देशभरात आतापर्यंत करोनाचे ३८७ रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनाचे आतापर्यंत ७ रुग्णांचे बळी घेतले आहेत.

>> नमस्कार, करोनाच्या उद्रेकानंतर विविध राज्यांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. त्याबाबतचे अपडेट्स आम्ही इथे देत आहेत. मटा ऑनलाइनचे लाइव्ह अपडेट्स पाहत राहा…

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here