हायलाइट्स:

  • मुंबई विमानतळावर ३५ किलो हेरॉइन जप्त
  • हवाई गुप्तचर विभागाची धडक कारवाई
  • २४० कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज केले जप्त
  • झिम्बाम्ब्वेच्या दोन नागरिकांना केली अटक

मुंबई: सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने (AIU) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल २४० कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. गुरुवारी ही कारवाई केली. अधिकाऱ्यांनी झिम्बाम्ब्वेच्या दोन नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३५ किलो हेरॉइन जप्त केले आहे. या वर्षातील ही सर्वात मोठी ड्रग्ज जप्तीची कारवाई असल्याचे सांगितले जाते.

याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर हवाई गुप्तचर विभागाच्या पथकातील अधिकाऱ्यांनी विमानतळावर आलेल्या एका व्यक्तीसह महिलेला रोखले. हे दोघेही इथिओपिया येथून आल्याचे सांगितले जाते. त्यांच्याकडील बॅगची झडती घेतली असता, त्यात सफेद पावडर असल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांनी फर्स्ट टेस्ट किटमध्ये तपासणी केली असता, ते हेरॉइन असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर अंमली पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आरोपींविरोधात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले.

मुंबई विमानतळावर १.४२ कोटींचे विदेशी चलन जप्त; तस्करीचे दुबई ‘कनेक्शन’ उघड
Kalyan : रेल्वेच्या पार्किंगमध्ये सकाळी पार्क केली दुचाकी; रात्री कामावरून परतल्यानंतर…

यापूर्वी २२ नोव्हेंबर रोजी युगांडामधून आलेल्या दोघी मायलेकींवर कारवाई करण्यात आली होती. त्या दोघीही दुबईमार्गे जुबा येथून मुंबईत आल्या होत्या. त्यांच्याकडे ४ किलो हेरॉइन सापडले होते. त्याची किंमत जवळपास २० कोटी रुपये इतकी होती. सप्टेंबरमध्ये याच विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाच महिलांना अटक केली होती. वेगवेगळ्या कारवाईत ही अटक झाली होती. त्यांच्याकडून कोट्यवधींचे हेरॉइन जप्त करण्यात आले होते.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी; कुटुंबाला संपवण्याचा इशारा
Mumbai : प्रेयसीचे लग्न ठरलं, साखरपुडाही झाला; संतापलेल्या प्रियकराने…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here