हायलाइट्स:

  • करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका
  • करोना लशीचा तिसरा डोस आवश्यक, तज्ज्ञांचं मत
  • तिसरा डोस घेण्यासाठी नागरिकांची चढाओढ

लंडन, यूके:

ब्रिटनमध्ये लाखो लोक करोनाच्या ‘ओमिक्रॉन‘ व्हेरियंटच्या संक्रमणामुळे धास्तावले आहेत. करोना लशीचा बुस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांची धावपळ उडालीय. याच दरम्यान करोना लशीच्या एका अभ्यासानं देशावरचा ताण आणखीन वाढलाय. या अभ्यासात ‘अॅस्ट्रेजेनेकाकोरोना ग्लूटेन काही महिन्यांतच ‘ओमिक्रॉन’ व्हेरियंटविरुद्ध अप्रभावी ठरत असल्याचं दिसून आलंय.

भारतातही ‘अॅस्ट्रेजेनेका’च्या लशीचा वापर

उल्लेखनीय म्हणजे, ‘ऑक्सफर्ड -अॅस्ट्रेजेनेका’ची हीच लस भारतात ‘कोव्हिशिल्ड‘ ओळखली जातेय. या लशीचं उत्पादनही भारतातच केलं जातंय. तसंच या लसीचा भारतातही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतोय. त्यामुळे ब्रिटनसोबतच आता भारताचंही टेन्शन वाढलंय. परंतु, देशात लाखो असे नागरिक आहेत ज्यांनी करोनाचा बुस्टर डोस घेतलेला नाही.

‘बुस्टर डोस’ घेण्याचं आवाहन

दिलासादायक गोष्ट म्हणजे, करोना लशीचा तिसरा डोस अर्थातच ‘बुस्टर डोस’ ओमिक्रॉन व्हेरियंटविरुद्ध ७६ टक्के फायदेशीर ठरत असल्याचं समोर येतंय. त्यामुळे तज्ज्ञांकडून करोना लसीचा तिसरा डोस घेण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येतंय.

ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या (National Health Service – NHS) बुकिंग साईटवर काही तांत्रिक समस्या असल्यानं ख्रिसमसपर्यंत अनेक लांकांना करोना लस घेऊ शकणार नाहीत, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलीय.

Covid 19 in US: अमेरिकेत दिवसात लाखभर करोनारुग्ण, पण ते ‘ओमिक्रॉन’बाधित नाहीत तर…
अमेरिकेच्या नाकावर टिच्चून निकारागुआचा चीनला पाठिंबा, तैवानशी तोडले संबंध
‘ओमिक्रॉन’चा वाढता धोका

‘डेलीमेल’च्या अहवालानुसार, ओमिक्रॉन ब्रिटनमध्ये अत्यंत तेजीनं हातपाय पसरताना दिसतोय. येत्या दोन आठवड्यांत याचे आणखीन भयावह परिणाम समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या महिन्याच्या अखेरपर्यंत संक्रमित रुग्णांची संख्या १० लाखांपर्यंत पोहचू शकते, असा इशाराच ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा यंत्रणेकडून देण्यात आलाय.

अभ्यासात काय दिसून आलं?

सरकारी शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात, ब्रिटनमधील ओमिक्रॉनच्या ५६१ प्रकरणांची तुलना डेल्टाच्या ५०,००० प्रकरणांशी केली. करोनाच्या नव्या व्हेरियंटविरुद्ध करोना लस किती चांगल्या प्रकारे संरक्षण करू शकतात, याचा अंदाज घेण्यासाठी हा अभ्यास सुरू करण्यात आला होता.

यात, ‘अॅस्ट्रेजेनेका’ लसीचे दोन डोस घेण्याऱ्या अधिकतर वृद्धांमध्ये ओमिक्रॉनविरुद्ध बचावासाठी खूपच कमी सुरक्षा आढळून आली.

त्याच वेळेस ‘फायझर’ लसीच्या डोसमुळे ३० टक्क्यांहून थोडं अधिक संरक्षण मिळत असल्याचं समोर आलं. परंतु तिसरा डोस म्हणून ‘पी फायझर’चा वापर केल्यानं मूळत: अॅस्ट्रेझेनेका लस घेणाऱ्यांना ७१ टक्के आणि पी फायझर लसीचे दोन डोस घेणार्‍यांना ७६ टक्के सुरक्षा आढळून आली.

पहिले दोन डोस कोणत्याही करोना लसीचे असतील आणि बुस्टर डोस ‘पी फायझर’चा घेतला गेला तर ओमिक्रॉनविरुद्ध ७०-७५ टक्के तर डेल्टाविरुद्ध ९० टक्के सुरक्षा मिळत असल्याचा अनुमान तज्ज्ञांनी काढलाय.

NO SMOKING: ‘या’ देशात येणार ‘सिगारेट’वर कायमची बंदी!
Boris Johnson: सहा महिन्यांपूर्वी विवाह; पंतप्रधान बोरिस जॉन्सन सातव्यांदा बनले ‘बाप’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here