हायलाइट्स:

  • पंधरा वर्षांपूर्वी या क्रीडा संकुलात अनधिकृत दुकानांचे गाळे उभारण्यात आले होते
  • हे दुकानांचे गाळे तोडण्याची कारवाई सुरू असताना या तिन्ही माजी नगरसेवकांनी त्या कामात अडथळा आणल्याचा आरोप होता
  • न्यायधीशांनी या माजी नगरसेवकांना दोषी ठरवत दोन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली

कल्याण: पालिकेच्या कामात अडथळा आणल्यामुळे शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवकांवर तुरुंगात खडी फोडण्यासाठी जाण्याची वेळ ओढावली आहे. सत्र न्यायालयाने या तिघांना दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्वर्गीय सावळाराम महाराज क्रीडा संकुलात अनधिकृत दुकाने तोडण्याची कारवाई महापालिकेच्यावतीने करण्यात येत होती. या कामात शिवसेनेचे माजी नगरसेवक सदानंद थरवळ, शरद गंभीरराव आणि तात्यासाहेब माने यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. यामुळे तिघांवरही गुन्हा नोंदवून हे प्रकरण न्यायालयात गेले होते. आता कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने या तिघांना दोन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तिन्ही नगरसेवक या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देणार आहेत.
देशमुखांना मालमत्तांविषयीचा हंगामी दिलासा कायम
डोंबिवली पूर्वेला सावळाराम महाराज क्रीडा संकुल आहे. पंधरा वर्षांपूर्वी या क्रीडा संकुलात अनधिकृत दुकानांचे गाळे उभारण्यात आले होते. हे दुकानांचे गाळे तोडण्याची कारवाई सुरू असताना या तिन्ही माजी नगरसेवकांनी त्या कामात अडथळा आणल्याचा आरोप होता. याबाबत तत्कालीन उपायुक्त रवींद्र वाघ यांनी डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. याच प्रकरणाची कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात शुक्रवारी अंतिम सुनावणी झाली. यावेळी न्यायधीशांनी या माजी नगरसेवकांना दोषी ठरवत दोन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावल्याची माहिती सरकारी वकील अॅ ड. सचिन कुलकर्णी यांनी दिली आहे.
हॉटेल व्यवसायाच्या आड देहव्यापार

याबाबत शिक्षा झालेल्या माजी नगरसेवकांशी संपर्क साधला असता या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सदानंद थरवळ आणि तात्यासाहेब माने यांनी सांगितले. डोंबिवलीचे उपायुक्त वाघ हे कधीच कार्यालयात हजर राहत नव्हते. त्यांना महासभेत, कार्यालयात आम्ही जाब विचारला होता. मात्र, क्रीडा संकुलातील दुकानांचे गाळ्यांचा विषय त्यांनी कोठून आणला हे आम्हाला शेवटपर्यंत कळले नाही. क्रीडा संकुल आम्हा तिघा नगरसेवकांच्या प्रभागात नव्हते. तेथील गाळे वाचविण्याचा प्रश्न नव्हता, असेही या माजी नगरसेवकांनी सांगितले.

kalyan Dombivli

दुकानांचे गाळे तोडण्याची कारवाई सुरू असताना या तिन्ही माजी नगरसेवकांनी त्या कामात अडथळा आणल्याचा आरोप होता. याबाबत तत्कालीन उपायुक्त रवींद्र वाघ यांनी डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here