मुंबई: राज्यातील करोना रुग्णांची संख्या ९७वर पोहोचली आहे. काल राज्यात एका दिवसात २३ नवे रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यूही झाल्याने खळबळ उडाली आहे. राज्यातील करोनाच्या मृतांची संख्या तीनवर गेली असून या तिन्ही रुग्णांचा मृत्यू मुंबईतील रुग्णालयात झाला आहे. मुंबईत आतापर्यंत ४१, पुणे १६, पिंपरी-चिंचवड १२, नागपूर ४, यवतमाळ ४, कल्याण ४, नवी मुंबई ४, सांगली ४, नगर २ आणि पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी आणि साताऱ्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यात संचारबंदी आणि जिल्हा बंदी करण्यात आली आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. जाणून घेऊया दिवसभरातील लाइव्ह अपडेट्स…

ताज्या घडामोडी:

वाचा:

>> राज्यात संचारबंदी सुरू

वाचा:

>> जमावबंदीचे उल्लंघन ३१ जणांवर गुन्हे दाखल

>> पुण्यानंतर पिंपरीत वाहनांच्या वाहतुकीस मनाई, सायकलही चालवण्यास बंदी

>> नाशिकमध्ये पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंतच पेट्रोल पंप सुरू राहणार

वाचा:

>> पुण्यात पीएमपीएलची सेवा ३१ मार्चपर्यंत बंद

>> नगरमध्ये चार तासच पेट्रोल पंप सुरू राहणार

>> भिवंडीत नमाज पठणासाठी गर्दी जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

>> सांगलीतील चारही रुग्ण सौदी अरेबियाला गेले होते

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here