परभणी : परभणीच्या पाथरी तालुक्यातील झरी या गावात २० वर्षीय तरुणाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुःखद घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश शिवाजी सत्वधर (२०) असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव असून निलेश हा औरंगाबाद इथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. एक महिन्यापूर्वी तो गावाकडे परत आला होता. काल सकाळी शेतात जाऊन येतो असं घरच्यांना सांगून तो निघाला. मात्र, तो परत आलाच नाही.

सर्वात दुःखद बाब म्हणजे आजच्या दिवशीच निलेशचा वाढदिवसही होता आणि वाढदिवसाच्या दिवशीच निलेशने टोकाचं पाऊल उचललं. मुलाचा वाढदिवस आहे. मात्र, तो कुठेच दिसत नसल्याने त्याचे वडिल शिवाजी सत्वधर यांनी गावात शोधाशोध सुरू केली. पण निलेश सापडला तो शेतातील लिंबाच्या झाडाला लटकलेला.

तुळजाभवानी दर्शनाला गाडी शहरात वळली अन् तरुणांवर काळाचा घाला, १२ जण असलेल्या क्रुझरचा भीषण अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेशने लिंबाच्या झाडाला साडीने गळफास घेऊन वाढदिवसाच्या दिवशीच आपलं जीवन संपवलं. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाली असता मानवत पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, निलेशने आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पण वाढदिवसाच्या दिवशीच त्याने एक्झिट घेतल्याने निलेशच्या आई-वडिलांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. तर झरी गावासह पाथरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

MIM च्या मोर्चाला औरंगाबादमध्ये रोखलं, गाड्यांचा ताफा आणि घोषणाबाजीने उडाला गोंधळ; पाहा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here