नवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध () गेल्या १५ डिसेंबरपासून शाहीन बागेत धरणे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी हटवले आहे. या बरोबरच दिल्ली आणि नोएडाला जोडणाऱ्या या मार्गावर उभाण्यात आलेले सर्वही तंबूही पोलिसांनी हटवून शाहीनबाग परिसर मोकळा केला आहे. करोनाचा दिल्लीत उद्रेक झालेला असताना, तसेच करोनामुळे संपूर्ण दिल्लीत लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला असतानाही आंदोलकांचे धरणे सुरूच होते.

शाहीन बागेत बसलेल्या आंदोलकांना हटवून त्यांनी उभारलेले तंबूही काढून टाकण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच प्रमाणे काही आंदोलकांना ताब्यातही घेण्यात आले आहे. शाहीन बागेत गेल्या १०० दिवसांपासून हे आंदोलन सीएएविरोधात आंदोलन करत होते.

करोनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहून लोकांना सतत आवाहन केले जात होते. आज सकाळी ७ वाजता आम्ही आमची कारवाई सुरू केली. सुरुवातीला काही लोक इथले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत होते. ते सांगूनही ऐकत नाहीत असे पाहून अखेर त्यांना आम्ही ताब्यात घेतले आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेश श्रीवास्तव यांनी दिली. परिसरात शांतता नांदावी असा आमचा उद्देश असल्याचेही ते पुढे म्हणाले. करोना विषाणूच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर कुठेही गर्दी जमू नये असे आदेश असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या ठिकाणी धरणे धरले गेले होते त्या परिसरातील सर्व तंबू हटवले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. इसे असतानाही काही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते.

आज सकाळीही अनेक महिला धरणे देत बसल्याचे पोलिसांनी सांगितले. दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आल्याने आता धरणे आंदोलन संपवा असे पोलिसांनी आंदोलक महिलांना सांगितले. मात्र आंदोलक महिला ऐकायला तयार नव्हत्या. यामुळेच पोलिसांना बळाचा वापर करत त्याना हटवणे भाग पडले असे पोलिसांनी सांगितले.

या पूर्वी पोलिसांनी ३१ मार्चपर्यंत केवळ ४ लोकांना येथे बसण्याची परवानगी दिली होती. ४ पेक्षा अधिक लोक या ठिकाणी दिसल्यास त्यांना अटक करण्यात येईल असेही पोलिसांनी सांगितले होते. तसेच आंदोलकांनाही वेगवेगळे बसण्याचा सल्ला दिला गेला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here