हिंगोली : शासनाने शाळा, महाविद्यालये सुरू केली ती सुरूही झाली. मात्र, त्यांच्यासाठी एसटी महामंडळाने एसटी बसची सोय केलेली नाही. त्यामुळे त्यांना चालत शाळा-महाविद्यालये गाठावी लागत आहेत. दररोज शेकडो विद्यार्थी एसटी बस अभावी पाच ते सहा किलोमीटरची पायपीट करून शिक्षण घेत आहेत. बस बंद असल्याने विद्यार्थांना बैल- गाडीचा आधार सुध्दा घ्यावा लागत आहे.
करोनामुळे दीड वर्षानंतर शाळा व महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यात एसटी कर्मचार्यांच्या बेमुदत संपामुळे ग्रामीण, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांवर शिक्षणासाठी रोज ५ ते १० किमीची पायपीट करण्याची वेळ आली आहे. एसटी संपामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फटका बसला असून शैक्षणिक नुकसान होत आहे. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आता विद्यार्थी मिळेल तो पर्याय वापरत आहेत. व्हॉट्सअॅपच्या एका लिंकने लावला १० लाखांचा चुना, फसवणुकीच्या डावाने पोलिसही हैराण घराचं आणि शाळेचं अंतर जास्त असल्याने काहीं विद्यार्थी पायपीट करत तर काही ठिकाणी बैलं गाडीचा पर्याय अवंबत असताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळत नसल्याने याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर सुद्धा होत आहे. राज्यात एकीकडे त्याच शाळेतील विद्यार्थिनींनी मानव विकास योजनेअंतर्गत सायकलींची व्यवस्था केली जाते. त्याच शाळेत शिकणाऱ्या मात्र कुठलीही व्यवस्था नाहीये. अनेक वेळा विद्यार्थी देखील सायकल ची मागणी करतात अद्याप तरी या मागणीवर तोडगा निघालेला नाही.
यामुळे लवकरात लवकर बस सेवा सुरू करण्यात यावी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. सोबतच बस अभावी इतरही प्रवाशांना, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, आर्थिक भुर्दंडही बसत आहे. तर हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी खाजगी वाहनातून सुद्धा विद्यार्थी जीवघेणा प्रवास करून शाळा गाठताना बघायला मिळतात. शाळेची घंटा तर वाजली मात्र एसटीची घंटा कधी वाढणार याकडे राज्यातील विद्यार्थ्यांचे सर्वांचे लक्ष आहे.