शरद पवार यांनी आजपर्यंत राज्याला आणि देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे तरुणांनी त्यांचं हे भाषणांचं पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजे. यामधून अनेकांना दिशा मिळेल, असेही राऊत यांनी म्हटले.

शरद पवार यांनी आजपर्यंत राज्याला आणि देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे तरुणांनी त्यांचं हे भाषणांचं पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजे. यामधून अनेकांना दिशा मिळेल, असेही राऊत यांनी म्हटले.
हायलाइट्स:
- मी शरद पवार यांना खुर्ची का दिली, हे समजायला त्यांची 61 भाषणं वाचली पाहिजेत
- मी निमंत्रणाशिवाय जावं, अशी मोजकीच कुटुंब महाराष्ट्रात आहेत. पवार कुटुंब त्यापैकीच एक आहे
- शरद पवार यांनी आजपर्यंत राज्याला आणि देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे
शरद पवार यांनी आजपर्यंत राज्याला आणि देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे तरुणांनी त्यांचं हे भाषणांचं पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजे. यामधून अनेकांना दिशा मिळेल, असेही राऊत यांनी म्हटले. तसेच महाराष्ट्रातील विरोधकांचा सन्मान करण्याच्या परंपरेविषयी सांगताना संजय राऊत यांनी पवारांचा एक किस्साही सांगितला. शरद पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर नागपूरात केलेलं भाषणही या पुस्तकात आहे. मात्र, मला शरद पवार यांनी सावरकर यांच्यावर बारामतीत केलेलं एक भाषण आठवतं. थोडेफार मतभेद असूनही महाराष्ट्रातून निर्माण झालेल्या वीर सुपूत्राचा सन्मान करणारे ते भाषण होते. आपल्या विरोधकांचा सन्मान करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. त्याच परंपरेला हे साजेसं भाषण होतं, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
यावेळी संजय राऊत यांनी आपल्या विरोधकांना इशाराही दिला. आमच्याकडे दारुगोळा खूप आहे, आम्ही तो वेळ आलो की फोडू, असे त्यांनी म्हटले. भाजप देशाचे तुकडे करत आहे. भाजप देशाला उलट्या दिशेने नेत आहे. हे पवारांनी 1996मध्ये सांगितलं होतं. ते आता आम्हाला कळू लागले आहे, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपला चिमटा काढला.
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून