हायलाइट्स:

  • ठाणे महापालिकेच्या डम्पिंग ग्राउंडला १४ गावांचा विरोध
  • १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीने विरोध
  • ठाणे महापालिका हद्दीतील कचरा टाकणार ग्रामीण भागात
  • ग्रामस्थ आक्रमक, बैठकीत घेतला मोठा निर्णय

दिवा : ठाणे महापालिका हद्दीतील कचरा १४ गावांमधील मौजे भंडारी येथे टाकण्यासाठी चार हेक्टर जागा ठाणे महानगरपालिकेने भाडेतत्त्वावर घेतली आहे. या निर्णयाला भंडार्ली ग्रामस्थांसह १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीने विरोध केला आहे. याबाबत भंडार्ली गावात बैठक पार पडली. यावेळी रमेश पाटील यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले की, डम्पिंगला जर रोखायचे असेल तर कायदेशीर संघर्ष, आंदोलन आणि रास्ता रोको करावाच लागेल असे सांगितले. दरम्यान डम्पिंग विरोध करण्यासाठी आंदोलन सुद्धा करू, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

ठाणे महापालिकेतील कचरा १४ गावांमधील मौजे भंडार्ली येथे टाकण्यासाठी चार हेक्टर जागा ठाणे महानगरपालिकेने भाडे तत्त्वावर घेतली आहे. या निर्णयाला भंडार्ली ग्रामस्थांसह १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीने विरोध केला आहे. आधीच १४ गावांमध्ये प्रदूषणाची समस्या असताना ठाणे महानगरपालिकेचा कचरा जबरदस्तीने आमच्या गावांच्या माथी मारू नये; अन्यथा आंदोलन करू, रस्त्यावर उतरू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. डम्पिंगला विरोध करण्यासाठी १४ गावांतील ग्रामस्थ जागोजागी बैठका घेत आहेत. गावागावात ठाणे महापालिका, आयुक्त, महापौर आणि विरोधीपक्ष नेते यांच्या निषेधाचे बॅनर लावले आहेत. दरम्यान काल शनिवारी संध्याकाळी भंडार्ली गावात बैठक पार पडली. या बैठकीला ठाणे जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील सुद्धा उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, डम्पिंगला जर रोखायचे असेल तर कायदेशीर संघर्ष, आंदोलन आणि रास्ता रोको करावाच लागेल. डम्पिंगला आमचा विरोध आहेच आणि जर डम्पिंग आलेच, तर कचऱ्याच्या गाड्या रोखून धरू असे ग्रामस्थ विजय पाटील यांनी सांगितले. डम्पिंग विरोध करण्यासाठी आंदोलन सुद्धा करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

धक्कादायक! नवजात बाळाला ट्रेनमध्ये सोडून देऊन पळ काढत होती महिला, पोलिसांनी…
fight against corona: ठाणेकरांसाठी अभिमानास्पद! कोरोनाशी लढा देताना अथक प्रयत्नांनी ‘हे’ करून दाखवले

बैठकीला जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीचे लक्ष्मण पाटील, रमेश पाटील, ज्ञानेश्वर येनदालकर, विजय पाटील, नामदेव पाटील, गुरुनाथ पाटील, चित्रा बाविस्कर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. तत्पूर्वी मनसे आमदार राजू पाटील यांनी सुद्धा डम्पिंगला विरोध करत सांगितले, की भंडार्ली गावात डम्पिंग आणले तर अधिकारी आणि नेत्यांना कचऱ्यात टाकू. आता सहनशक्तीचा अंत झाला आहे. वारंवार केसेसची धमकी दाखवून डम्पिंग लादत असाल, तर होऊ जाऊ द्या गुन्हे दाखल, असा इशाराच त्यांनी दिला.

Thane : मनसे कडून शिवसेनेच्या विरोधात एल्गार

281 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here