मुंबई : महाराष्ट्रात ओमिक्रॉन (Omicron) या नवीन विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा वाढत असतानाच, मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. आतापर्यंत राज्यात १८ रुग्ण ओमिक्रॉनबाधित असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यापैकी ९ रुग्णांना आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात ओमिक्रॉन या नवीन विषाणूचा प्रादूर्भाव वाढत आहे. नागपूरमध्ये आज, रविवारी पहिला ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉनबाधितांचा आकडा १८ वर पोहोचला आहे. असं असतानाच, एक दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या १८ रुग्णांपैकी ९ रुग्णांना आतापर्यंत रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Omicron In Nagpur : राज्याची चिंता वाढली; नागपूरातही ओमिक्रॉनचा शिरकाव
…तर अॅण्टीबॉडीजवर परिणाम

आतापर्यंत राज्यातील मुंबईत ५, पिंपरी-चिंचवडमध्ये १०, पुणे महापालिका हद्दीत १, कल्याण-डोंबिवलीत १ आणि नागपूरमध्ये १ असे एकूण १८ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आहेत. यापैकी ९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून सोडले आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, आफ्रिकेतून नागपूर येथे आलेल्या ४० वर्षीय व्यक्तीला ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे. लक्षणे सौम्य असून सध्या एम्समध्ये विलगीकरणात ठेवण्यात आला आहे. या रुग्णाच्या संपर्कात ३० जण आले होते. त्यांचा शोध घेण्यात आलेला आहे. या सर्वांचा कोविड चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. हा रूग्ण यापूर्वी ११ एप्रिल रोजी कोविडबाधित आढळला होता. तेव्हा देखील त्याच्यात सौम्य लक्षणे होती. त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासलेली नव्हती. या रुग्णाने आतापर्यंत एकही लस घेतलेली नाही, अशी माहिती आहे.

भारतात तिसरी लाट येणार का? omicron च्या धोक्यावर who च्या अधिकाऱ्याने दिले उत्तर
omicron india : धक्कादायक! ‘तो’ मुंबईत उतरला, नंतर ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळला

राज्यात आज काय स्थिती?

  • आज ६९९ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६४,९२,५०४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७२ टक्के एवढे आहे.
  • आज राज्यात ७०४ नवीन रुग्णांचे निदान
  • राज्यात आज १६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,६८,७५,९७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,४३,८८३ (९.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह
  • सध्या राज्यात ७५,३१३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये, तर ८५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here