हिंगोली : जिल्‍ह्यात मागच्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असून दिवसभर अंगात थंडी राहात असल्याने नागरिकांकडून स्‍वेटर व मफलरचा वापर वाढला आहे. तसेच हे वातावरण शेतीला व रब्‍बीतील हरभरा, गहु पिकांसाठी लाभदायक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. थंडीचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. जिल्‍ह्यात मागच्या आठवड्यात दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण असे चित्र होते. ढगाळ वातावरणामुळे गारवा कमी झाला होता. त्‍यामुळे उष्णता देखील वाढली होती. आता दोन दिवसांपासून जिल्‍ह्यात थंडीचा जोर वाढला आहे.

वाढत्या थंडीमुळे उबदार कपड्यांना सुध्दा मागणी वाढली आहे. सकाळी गारवा व दिवसभर थंडी कायम आहे. अनेकांनी अंगातील स्‍वेटर, मफलर काढलेच नाहीत. वाढलेल्या थंडीमुळे उबदार कपड्यांना देखील मागणी देखील वाढली आहे. शहरातील गांधी चौकासह अकोला रस्‍त्‍यावर स्‍वेटर विक्रेत्यांनी दुकानाचे स्‍टॉल उभारले आहेत. थंडीमुळे दुकानातील उबदार कपड्यांची विक्री होत असल्याचे विक्रेते सांगत आहेत. तर अनेक भागात सकाळ व सायंकाळच्या वेळी शेकोट्या पेटवून उब घेतली जात आहे.
राज ठाकरेंनी कंबर कसली, आठवड्यात ३ दौरे आणि कार्यकर्त्यांच्या भेटीचा सपाटा, निवडणुकीचा मास्टरप्लॅन तयार?
परतीच्या पावसाने मुबलक पाणी वाढलेल्या थंडीमुळे रब्‍बीतील गहु व हरभरा या पिकांना देखील दिलासा मिळणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. हिंगोली जिल्‍ह्यात अंदाजे दोन लाख हेक्‍टर क्षेत्रावर रब्‍बीची पेरणी झाली आहे. यात हरभरा पिकाचे पेरणी क्षेत्र दीड लाख हेक्‍टर ऐवढे आहे. वाढलेल्या थंडीमुळे मागच्या काही दिवसांपुर्वी झालेल्या धुक्‍यामुळे बुरशीजन्य व तांबेरा हा रोग पडला होता. मात्र, थंडीमुळे आता या पिकांना दिलासा मिळाला आहे.

यावर्षी झालेल्या परतीच्या पावसाने सध्या विहिरी, बोअरवेल व शेततळ्यात देखील मुबलक पाणी असल्याने त्‍याचा उपयोग पिकांना देण्यासाठी केला जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पिकांची वाढ होण्यास मदत होणार सध्या दोन दिवसांपासून थंडीचा वाढलेला जोर रब्‍बीच्या पिकांसाठी आशादायक आहे. यामुळे पिकांची वाढ होण्यास मदत होणार आहे. मागच्या काही दिवसांपुर्वी पडलेल्या धुक्‍यामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम झाला होता. आता पडत असलेल्या थंडीमुळे पिकांना चांगला फायदा होणार आहे.

वाढत्या थंडीचा फायदा घेत सकाळी सकाळी व्यायाम करण्यासाठीं नागरिकांची रीघ वाढली आहे तर पोलीस भरती, सैन्य भरतीची तयारी करताना मुले बघायला मिळत आहेत.
माझ्या मित्रावर ईडीचा छापा कसा पडला, जाहीर सभा घेऊन सांगणार : रावसाहेब दानवे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here