गोंदिया : राज्यात काही केलं तरी महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अशाच आणखी एक राज्याला हादरवून सोडणारा प्रकार समोर आला आहे. विवाहीत महीलेचा विनयभंग करून तिला मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर यानंतर महिलेच्या कपड्याच्या दुकानालाही आग लावण्यात आल्या प्रकार घडला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियाच्या गोविंदूपरच्या आंबेडकर चौकातील ही खळबळजनक घटना आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे श्वानावरून झालेल्या वादात विवाहीत महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करत तिला मारहाण करण्यात आली. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने महिलेच्या पतीच्या कापड दुकानाला आग लावली.

मित्राच्या लग्नात पाहिलं आणि पुन्हा डोक्यात गेला, तरुणाची सपासप वार करुन हत्या; कारण वाचून हादराल
याप्रकरणी पोलीसांनी आरोपी ऋतिक विजय मेश्राम याला अटक केली असली तरी पोलीस आरोपीची पाठराखण करीत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. आरोपीच्या श्वानावरून आरोपी व महिला या दोघांत किरकोळ वाद झाला होता. दरम्यान, रात्री ती महिला आपल्या घरी असताना आरोपीने तिचा विनयभंग केला, त्यानंतर तिला मारहाण करायला सुरूवात केली. त्या महिलेने आरडाओरड केल्यामुळे पती मदतीसाठी धाऊन आला. त्यांनाही आरोपीने मारहाण केली.

या वादानंतर आरोपी ऋतिक तिथून निघाल्यावर त्याने त्यांच्या कापडाच्या दुकानात पेट्रोल टाकत आग लावली. यामुळे पीडित महिला व तिच्या पतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आरोपीविरूद्ध गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४, ४५२, ४३६, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

शेतातून अचानक गायब झाला राखणदार, २ दिवसांनी कुटुंबियांसमोर आली धक्कादायक माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here