हायलाइट्स:
- सोशल मीडियावर जान्हवी कपूरला झाली ट्रोल
- दुखापत झालेल्या जान्हवीची विचारपूस करणा-या फोटोग्राफर्सकडे केले दुर्लक्ष
- युझर्स म्हणाले किती हा गर्व
काय आहे व्हिडिओ?
जान्हवीचा हा व्हिडिओ विरल भयानी यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमुळे जान्हवीवर युझर्सने खूप टीका आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवीने डाव्या हाताला दुखापत झाल्यामुळे तिने स्लिंग घातलेले दिसत आहे. त्याबद्दल काळजीपोटी तिला काय झाले आहे असे विचारणा होते. परंतु विचारणा-यांकडे ती चक्क दुर्लक्ष करत आणि त्यांच्याकडे न पाहता ती सरळ गाडीत जाऊन बसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून जान्हवीच्या अॅट्यिट्यूडमुळे तिच्यावर टीकेचा भडीमार होत आहे.
काय म्हणाले युझर्स
जान्हवीला ट्रोल करताना एका युझरने लिहिले आहे की, ‘ हिला इतका कसला गर्व आहे?’, आणखी एका युझरने लिहिले की ‘गर्व तर बघा जशी मोठी स्टार आहे.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘तिने तर रिप्लायही दिला नाही.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘बॉयफ्रेंडने मारलं असणार म्हणून हाताला दुखापत झाली, त्याच्यामुळेच टी-शर्टवरून मेसेज देते.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘एवढा गर्व पण चांगला नाही.’