अकोला: अकोला विधान परिषदेच्या अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी १० डिसेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडली. नेमकं या मतदान पेटित कोणाचं भाग्य दडलं आहे, याकडे आता सर्वांचं लक्ष लागून होतं. आज अखेर यासाठी मतमोजणी होणार आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे तर एकून पाच टेबलांवर मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. २२ केंद्रावरुन जमा केलेल्या २२ मतपेट्यांची याठिकाणी मतमोजणी सुरवात होणार आहे.

विधान परिषद निवडणूकीसाठी अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील २२ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले होते. तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य असलेल्या ८२२ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार होते. मात्र, या ८२२ मतदारांपैकी ८०८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे.

नागपूर हादरले! १९ वर्षीय गायक तरुणीचे अपहरण करुन सामुहिक बलात्कार
खरंतर, ही लढत एका घट्ट मित्रांमध्ये आहे. भाजपचे वसंत खनडेलवाल आणि महाविकास आगाडीचे गोपिकीशन बाजोरिया या दोन मित्रांमध्ये ही लढत आहे. हा विधानपरिषदेचा गुलाल नेमका आता कोणाच्या खांद्यावर उधळतो याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

यावेळी बाजोरिया निवडून आले तर बाजोरीयांची चौथ्यादार हॅटट्रिक होईल, जर बाजोरिया यांचा पराभव होऊन वसंत खंडेलवाल यांचा विजय झाला तर पाहिल्यांदार विधान परिषदमध्ये कमळ फुलेल. मात्र, यात विधानपरिषदेचा गुलाल कोणाचा…? यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे कक्ष लागले आहे. आज १२ वाजेपर्यंत नेमकं अकोला विधानपरिषदेचं चित्र काय असेल ते समोर येईल.

लहान भावाने भांडणात मध्यस्थी केली आणि मोठ्या भावाच्या जीवावर बेतली….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here