औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री त्यांचं शहरात आगमन झालं. यावेळी शहरातील बाबा चौकात राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, राज ठाकरे स्वागत न स्वीकारता थेट शासकीय विश्राम गृहाकडे निघून गेले. मात्र स्वागत न स्वीकारण्याचं कारण त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

रात्री साडे सात वाजत राज ठाकरे बाबा पेट्रोल पंप चौकात दाखल झाले. यावेळी ढोल ताशे, मोटरसायकल रॅली आणि फुलांच्या मोठे हार असा जंगी स्वागत करण्याचा प्लॅन शहर मनसेकडून करण्यात आला होता. पण राज ठाकरे ते न स्वीकारताच पुढे निघून गेले. मात्र, शासकीय विश्राम गृहात आलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी याचं कारण सांगितले. ‘माझा पाय मोडला त्यानंतर हात मोडला’, नंतर एक-एक करत अनेक विघ्न येत गेले. त्यामुळे स्वागत स्वीकारू शकलो नसल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं.

ठरलं! विद्यार्थ्यांनो आता ‘या’ तारखेपासून शाळा होणार सुरू, करोनाचा धोका कमी असल्याने पालिकेचा निर्णय
दरम्यान, राज ठाकरे आज दिवसभर औरंगाबादमध्ये असणार आहे. सकाळी दहा वाजेच्या दरम्यान मराठवाड्यातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. त्यानंतर सुमारे दोन वाजता राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता एका खाजगी कार्यक्रमाला हजेरी लावून, राज ठाकरे पुण्याकडे रवाना होतील.

खंरतर, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यकर्त्यांची आढावा बैठक मंगळवारी सिडको एन आठ परिसरातील सप्तपदी मंगल कार्यालयात होणार आहे. यावेळी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Good News! महाराष्ट्रातला ‘हा’ जिल्हा सगळ्यात सुरक्षित, करोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाणही कमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here