आतापर्यंत करोनाच्या बाबतीत औरंगाबाद शहर आणि जिल्हा अग्रेसर असल्याचे दिसून आले. त्या पाठोपाठ बीड जिल्ह्याचा क्रमांक लागतो. आतापर्यंत मराठवाड्यात ६ लाख ४२ हजार रुग्णांना करोनाची लागण होउन गेली त्यापैकी ६ लाख २४ हजार रूग्ण बरे झालेत. सद्या स्थितीत २७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागरिकांनी भयभीत न होता लसीकरण करण्यास सहभागी व्हावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सुरक्षित अंतर पाळावे, मास्क चां नियमित वापर करावा जेणे करुन रूग्ण अंख्या वाढणार नाही याची खबरदारी आणि काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केल जात आहे.
हिंगोली आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत १६०६२ लोकांना करोनाची लागण झाली. त्यापैकी १५६६१ रूग्ण बरे झाले. तर आतापर्यंत ३९६ रुंगणाचा मृत्यू झाला आहे. आजच्या घडीला जिल्ह्यात ५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मराठवाड्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत ही स्थिती बरी आहे. मृत्यू दर संख्या व रुग्णांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन चिकाटीने प्रयत्न करत आहे.
ओमिक्रॉन आणि करोनाच्या धर्तीवर १००% लसीकरण पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित ठेवता यावे यासाठी हिंगोली जिल्ह्यात शर्यतीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच बरोबर कोविड -१९ रुग्णालयात इतरही भौतिक सुविधा वाढवलायचे बघायला मिळते आहे. मुबलक ऑक्सिजण पुरवठा, बेड संख्या वाढवली, त्याचं बरोबर इतरही सूविधा चा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. (Marathwada lowest number of corona patients in hingoli district death rate is also low )
(मराठवाड्यात सर्वात कमी कोरोना रुग्ण हिंगोली जिल्ह्य़ात मृत्यूदरही कमी)