औरंगाबादच्या ग्रामीण भागात १ डिसेंबरपासूनच पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र महापालिका हद्दीत अजूनही शाळा बंदच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यात शहरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याने, शाळा सुरू करण्याबाबत प्रशासनाने निर्णय घेतला असल्याचे बोललं जात आहे.
लसीकरणाच्या मोहीमेचा वेग वाढावा म्हणून औरंगाबाद जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या पद्धतीने मोहीम राबवत आहे. त्याचबरोबर काही कठोर निर्णय सुद्धा प्रशासनाकडून घेतले जात आहे. त्यातच आता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नवीन आदेश दिले आहे. लसीकरण न केलेल्या विद्यार्थ्यांना दर सात दिवसांनी करोना चाचणी करणे बंधनकारक असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली होती, त्यानुसार वेळोवेळी चाचणी होणार का? हेदेखील पाहणं महत्त्वाचं आहे.