हायलाइट्स:

  • अभिनेत्री चाहत खन्ना पुन्हा चर्चेत
  • दोनदा घटस्फोट घेतल्यानंतर पुन्हा प्रेमात
  • सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली

मुंबई: हिंदी टीव्ही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री चाहत खन्ना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी तिनं तिच्या आयुष्यातील धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला होता. पण चाहत आता पुन्हा तिसऱ्यांदा प्रेमात पडली आहे. चाहतनं सोशल मीडियावर प्रेमात पडल्याची कबुली दिली आहे.
नऊ महिन्याची गरोदर असताना मला घराबाहेर काढलं;अभिनेत्रीने मांडली व्यथा
चाहतनं ही खास गोष्ट सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेता रोहन गंडोत्राला डेट करत असल्याचं चाहतनं सांगितलं आहे. चाहत आणि रोहनच्या चाहत्यांकडून या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत चाहतनं तिच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले होते. ‘२०१३ साली मी फरहानसोबत लग्न केलं आणि २०१८ साली आम्ही वेगळे झालो. आमच्या दोन मुली आहेत. पण या काळात त्यानं मला प्रचंड त्रास दिला. माझ्या दोन्ही गरोदरपणाच्या वेळेस तो मला हे बाळ नक्की माझंच आहे ना? असे प्रश्न विचारायचा.

दुसऱ्या मुलीच्या डिलिव्हरीच्या एक दिवस अगोदर त्यानं मला घराबाहेर काढलं. डिलिव्हरीच्या चार दिवसांनंतरही तो तसाच वागला. तो प्रत्येकवेळी मला घरातून निघून जायला सांगायचा. तो मला मारायचा. प्रत्येक दुसऱ्या दिवशी माझं नाव दुसऱ्याचं कोणासोबत जोडायचा. त्यानं तर माझ्या आणि माझ्या भावाच्या नात्यावरही संशय घेतला होता.’ असे धक्कादायक अनुभव चाहतनं सांगितले होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here