दक्षिण कोरियात शेंचेनजी चर्चच्या माध्यमातून पसरलाअसल्याचे समोर आले. ही ६१ वर्षीय महिला याच चर्चची सदस्य आहे. सात फेब्रुवारी रोजी चर्चमधून प्रार्थना करून बाहेर आल्यानंतर या महिलेचा छोटासा अपघात झाला. त्यावेळी तपासणीसाठी ती महिला पहिल्यांदा रुग्णालयात गेली होती. त्यावेळी तिने घसा दुखत असल्याची तक्रार केली होती. या दरम्यान तिला तापही आला होता. काही दिवस रुग्णालयात तिच्यावर उपचार झाले. काही दिवसांनी तिला डिस्चार्ज देण्यात आला.
वाचा:
या महिलेला डॉक्टरांनी दोन वेळेस करोनाची चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, या महिलेने चाचणी करून घेण्यास नकार दिला असल्याचे न्यू यॉर्क टाइम्सने म्हटले आहे. त्यानंतर डॉक्टरांनी या महिलेची १७ फेब्रुवारी रोजी तपासणी केली. त्यावेळी तिला करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. मात्र, या महिलेला विषाणूची लागण कशी झाली, हे डॉक्टरांना समजले नव्हते. दरम्यान, ही महिला रुग्णालयात असताना रविवारच्या प्रार्थनेसाठी शेंचेनजी चर्चमध्ये दोन वेळेस गेली होती. त्या दरम्यान, या महिलेचा प्रत्येक वेळेस किमान हजार लोकांशी संपर्क आला असल्याचे वृत्त आहे. या महिलेच्या संपर्कातून रुग्णालयातील सुमारे १०० जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. तर, या महिलेला करोनाचा संसर्ग असल्याचे निष्पन्न होईपर्यंत ही महिला सार्वजनिक स्थळांवरही वावरत होती. या महिलेमुळे किमान हजारोंना करोनाचा संसर्ग झाला असल्याचा दावा करण्यात येत आहे.
आणखी वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times