औरंगाबाद न्यूज लाइव्ह: राज्याभर करोनाची चिंता पण ‘या’ जिल्ह्याने दिली चांगली बातमी, ओमिक्रॉनचाही धोका नाही! – number of corona patients has decreased in aurangabad district
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील नव्या करोनाबाधितांबरोबरच बाधितांच्या मृत्युमध्येही लक्षणीय घट असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे शहरातील नवी बाधित संख्या ही पाच ते सहापेक्षा कमीच असल्याचे मागच्या आठवड्यापासून दिसून येत आहे. त्याचप्रमाणे बाधित मृत्युदेखील लक्षणीय प्रमाणात घटल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर हा शहरवासीयांना दिलासा असला, तरी वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित वावर या त्रिसूत्रीचे पालन यापुढेही गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे स्पष्ट केले. (number of कोरोना रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात घट झाली आहे.
औरंगाबाद शहर परिसरात सोमवारी (१३ डिसेंबर) पाच नवे बाधित आढळून आले, तर १२ डिसेंबर रोजी ४, ११ डिसेंबर रोजी ६, १० डिसेंबर रोजी २, ९ डिसेंबर रोजी ६, ८ डिसेंबर रोजी ६, तर ७ डिसेंबर रोजी ३ नवे बाधित आढळून आले आहेत. तसेच १३ डिसेंबर रोजी ग्रामीण भागात १ नवा बाधित आढळून आले, तर १२ डिसेंबर रोजी २, ११ डिसेंबर रोजी शून्य, १० डिसेंबर रोजी १, ९ डिसेंबर रोजी शून्य, ८ डिसेंबर रोजी शून्य, तर ७ डिसेंबर रोजी पुन्हा शून्य बाधित आढळून आले. त्यामुळे शहराच्या तुलनेत ग्रामीण परिसरात बाधित संख्या आणखी जास्त घटत असल्याचे स्पष्ट झाले आहे. धक्कादायक! लॉज मालकाने खून करून स्वत: केली आत्महत्या, सत्य समोर येताच पोलिसही हैराण एकीकडे नव्या बाधितांची संख्या घटत असतानाच बाधित मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय प्रमाणात घटत असल्याचे दिसून येत आहे. १३ डिसेंबरला औरंगाबाद जिल्ह्यात एकही बाधित मृत्यू नसल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. १२ डिसेंबर रोजी शून्य, ११ डिसेंबर रोजी १, १० डिसेंबर रोजी १, ९ डिसेंबर रोजी शून्य, ८ डिसेंबर रोजी १, ७ डिसेंबर रोजी शून्य मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. हा जिल्ह्यासाठी नक्कीच दिलासा असला, तरी अजूनही त्रिसूत्री पालनाशिवाय पर्याय नसल्याचे तज्ज्ञांकडून वारंवार सांगितले जात आहे. (number of corona patients has decreased in Aurangabad district)