जालना : राज्यात गुन्हेगारी आणि हत्येच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. अशात जालन्यातही हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेची राहत्या घरी निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे तर पोलिसही या घटनेचा तपास करत असल्याची माहिती आहे. (Brutal murder of a woman at her residence in Jalna)

मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरातील शिवाजी पुतळा रोडवरील पोस्ट ऑफिस जवळील भागात एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. संगीता अलोकचंद लाहोटी (वय ६२)असं मृत महिलेचं नाव आहे. संगीता यांच्या राहत्या घरात चाकूने भोसकून निर्दयी खून करण्यात आला. या सगळ्या घटनेमुळे शेजारच्यांनाही मोठा धक्का बसला आहे. नेमकी ही हत्या का झाली? याचा पोलीस तपास करत आहेत.

धक्कादायक! लॉज मालकाने खून करून स्वत: केली आत्महत्या, सत्य समोर येताच पोलिसही हैराण
हा सगळा प्रकार आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या निर्दयी खुनाचे कारण अद्यापही समजून आले नाही. सदर बाजार पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास चालू आहे. खुनाचा अधिक तपास करण्यासाठी पोलीस कुटुंबियांशी आणि शेजाऱ्यांचीही चौकशी करणार असल्याची माहिती आहे. (Brutal murder of a woman at her residence in Jalna)

Breaking : राज ठाकरेंच्या दौऱ्यावेळी मोठी कारवाई, मनसे जिल्हाध्यक्षांना अचानक पदावरून काढलं
(जालना येथे राहत्या घरी महिलेची निर्घृण हत्या)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here