हायलाइट्स:

  • भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनास स्थगिती देण्यात सुप्रीम कोर्टाचा नकार
  • सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर नवाब मलिक यांचा भाजपवर निशाणा
  • भाजप संवैधानिक पदावर आणि संस्थेच्या अधिकारांवर गदा आणण्याचे काम करत असल्याचा आरोप
  • आता तरी संवैधानिक संस्थेचे व पदाचे महत्त्व भाजपला कळले पाहिजे – मलिक

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेतील भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा झटका मानला जात आहे. याच मुद्द्याला अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला जोरदार ‘चिमटा’ काढला आहे.

भाजप या देशात संवैधानिक पदांवर आणि संस्थेच्या अधिकारांवर गदा आणण्याचे काम करतेय, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. भाजप आमदारांनी निलंबनाला स्थगिती मिळावी, यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता. मात्र स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्यानंतर नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. घटनेनुसार निर्माण झालेली संस्था किंवा पदाचा आदर करावा व त्या अधिकारावर गदा आणण्याचे काम करू नये, असा सल्लाही नवाब मलिक यांनी भाजपला दिला.

supreme court : भाजपला झटका; १२ आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
maharashtra MLC election results 2021: अकोला, नागपूरमध्ये भाजपच्या विजयानंतर नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप, म्हणाले…

महाराष्ट्र विधानसभेतील १२ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी घेतानाच, निलंबनाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. विधानसभा अध्यक्षांकडे न्याय मागण्याचे आदेश देत, कोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने संवैधानिक संस्थेचा व पदाचा आदर ठेवून निर्णय दिला आहे, अशी प्रतिक्रिया मलिक यांनी दिली.

आरोप करणं थांबवा, अन्यथा तुमच्या कुटुंबातील महिलांवर…, नवाब मलिकांना धमकीचं खळबळनजक पत्र

विधानसभेत कुठलाही आमदार गैरवर्तन करत असेल तर, त्यांचे निलंबन करण्याचा अधिकार विधानसभेत अध्यक्षांचा व विधानसभेचा असतो. असे असताना त्या अधिकाराला आव्हान देण्याचा प्रयत्न भाजप आमदारांनी केला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने संवैधानिक संस्थेचा व पदाचा आदर ठेवत भाजप आमदारांच्या अर्जावर निर्णय देताना, स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे आता तरी भाजपला संवैधानिक संस्थेचे महत्त्व कळले पाहिजे, असा टोला मलिक यांनी लगावला.

Mumbai : पैसे देऊन केला गेलेला घोडेबाजार थांबवायला हवा | नवाब मलिकांचा भाजपला टोला

निलंबित झालेले आमदार

संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, पराग अळवणी, हरीश पिंपळे, योगेश सागर, जयकुमार रावल, नारायण कुचे, राम सातपुते आणि बंटी भांगडीया अशी या निलंबित आमदारांची नावे आहेत. या आमदारांच्या निलंबनासाठी ठराव विधिमंडळ कामकाजमंत्री अनिल परब यांनी मांडला होता. हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला होता. एका वर्षासाठी निलंबित करण्याच्या विधानसभेच्या ठरावाविरोधात त्या आमदारांनी सुप्रीम कोर्टात २२ जुलै रोजी याचिका दाखल केली होती. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here