दापोली नगरपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवसापर्यंत शिवसेनेचे उमेदवार जाहीर करण्यात आले नव्हते. शेवटच्या दिवशी शिवसेना राष्ट्रवादी आघाडी जाहीर करण्यात आली. यात शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी व त्यांचा गट पुन्हा सक्रिय झाला व त्यांना शिवसेनेचे तिकीट वाटपाचे अधिकार देण्यात आले.

योगेश कदम फोटो

शिवसेना राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलं होते.

दापोली: दापोली विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम यांचा फोटो नगरपंचायत निवडणुकीतील प्रचारसभेच्या बॅनरवरुन गायब झाल्याने शिवसैनिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान अनिल परब व माजी पर्यावरण मंत्री नेते रामदास कदम यांच्यातील दापोली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 निमित्त आज दापोली शहरात केळसकर नाक्यावर शिवसेना व राष्ट्रवादी आघाडीची जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री अनिल परब,ना.उदय सामंत, खा.सुनील तटकरे आदी नेते यावेळी उपस्थित होते. मात्र या सभेच्या स्टेजवर लावलेल्या बॅनर वरून शिवसेनेचे नेते व माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम यांचे फोटोच गायब होते. कित्येक वर्षे संघटनेच्या कामकाजापासून दूर असलेल्या माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा फोटो या फ्लेक्सवर लावण्यात आल्याने शिवसैनिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
कोकणात निवडणूक वातावरण तापलं; शिवसेना-राष्ट्रवादीत आघाडी, पण नेत्यांमध्ये…
दापोली नगरपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवसापर्यंत शिवसेनेचे उमेदवार जाहीर करण्यात आले नव्हते. शेवटच्या दिवशी शिवसेना राष्ट्रवादी आघाडी जाहीर करण्यात आली. यात शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी व त्यांचा गट पुन्हा सक्रिय झाला व त्यांना शिवसेनेचे तिकीट वाटपाचे अधिकार देण्यात आले. या सर्व प्रक्रियेतून शिवसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम निवडणूक प्रक्रियेपासुन दुर ठेवण्यात आले आहे. या सगळ्या प्रकारामुळे संभ्रमात पडलेल्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेद्वारांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
रामदास कदम यांना शिवसेनेनं उमेदवारी का नाकारली?; संजय राऊत म्हणाले…
शिवसेना राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलं होते. या सभेसाठी दापोलीत दोन्ही पक्षाचे बॅनर, झेंडे लावण्यात आले होते. मात्र, या बॅनरवर शिवसेनेचे कोकणातील नेते व माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम , दापोलीचे आमदार योगेश कदम यांचे फोटो लावण्यात आलेले नव्हते. स्टेजवरील बॅनरवर माजी खासदार अनंत गीते, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सूर्यकांत दळवी, युवासेनेचे नेते अमोल कीर्तिकर, रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे व सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांचे फोटो झळकत होते. दापोलीचे आमदार योगेश कदम यांना दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत तिकीट वाटपात स्थान न देणे नंतर बॅनरवर फोटो न लावणे या सर्व प्रकारामुळे शिवसैनिकांमध्ये आश्चर्यजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: दापोली नगरपंचायत निवडणुकीतील शिवसेनेच्या बॅनरवरून आमदार योगेश कदमचा फोटो गायब
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here