गेली अनेक वर्षे दरेकर हे बँकेचे अध्यक्ष असून मजूर या वर्गातूनच ते निवडून येत आहेत. मजूर सहकारी संस्थांच्या उपविधित मजुराची व्याख्या दिलेली आहे. अंगमेहनत करणारी व्यक्ती ही मजूर म्हणून गणली जाते.

मुंबै बँकेच्या निवडणुकीसाठी दरेकरांचा मजूर प्रवर्गातून अर्ज; आता सहकार विभागाने धाडली नोटीस

मुंबै बँकेच्या निवडणुकीसाठी दरेकरांचा ‘मजूर’ प्रवर्गातून अर्ज; आता सहकार विभागाने धाडली नोटीस

हायलाइट्स:

  • अंगमेहनत करणारी व्यक्ती ही मजूर म्हणून गणली जाते
  • शारीरिक श्रमातून मजुरी करणारा असला पाहिजे, असेही या उपविधीत नमूद आहे
  • त्यामुळे प्रवीण दरेकर कोणत्या अंगाने मजूर वर्गात मोडतात, हा प्रश्न उपस्थित झाला होता

मुंबई : मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील संचालकपदाच्या निवडणुकीसाठी मजूर प्रवर्गातून अर्ज दाखल करणारे भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संचालकपदाच्या निवडणुकीसाठी तुम्ही मजूर प्रवर्गातून अर्ज दाखल केला. त्यामुळे तुम्ही कुठल्या पद्धतीने मजूर वर्गात मोडता, अशी विचारणा सहकार विभागाने नोटीस पाठवून केली आहे. त्यामुळे आता प्रवीण दरेकर या नोटीसला काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. प्रवीण दरेकर हे सध्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. तसेच ते मुंबै बँकेचे विद्यमान अध्यक्षही आहेत. या सगळ्यातून महिन्याला दरेकर यांना साधारण अडीच लाखांचे मानधन मिळते. त्यामुळे आता प्रवीण दरेकर आपल्या मजूर असण्याचे समर्थन कशाप्रकारे करणार, हे पाहावे लागेल.
Pravin Darekar: पवारांच्या ‘त्या’ भाषणाची क्लिप माझ्याकडे आहे!; एसटी संपावर दरेकर आक्रमक
गेली अनेक वर्षे दरेकर हे बँकेचे अध्यक्ष असून मजूर या वर्गातूनच ते निवडून येत आहेत. मजूर सहकारी संस्थांच्या उपविधित मजुराची व्याख्या दिलेली आहे. अंगमेहनत करणारी व्यक्ती ही मजूर म्हणून गणली जाते. शारीरिक श्रमातून मजुरी करणारा असला पाहिजे, असेही या उपविधीत नमूद आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर कोणत्या अंगाने मजूर वर्गात मोडतात, हा प्रश्न उपस्थित झाला होता. सहकार सुधार पॅनेलचे अंकुश जाधव, संभाजी भोसले यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे याविषयी आक्षेप नोंदवत याविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना नोटीस पाठवल्याचे समजते.
राष्ट्रवादीच्या आमदाराला भाजपनं दिली १०० कोटींची ऑफर?; प्रवीण दरेकर म्हणतात…
मुंबै बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या २ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. या निवडणुकीत भाजपचे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड मैदानात उतरले आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रसाद लाड यांनी नुकतीच मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मुंबै बँकेच्या निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती केली होती. आतापर्यंत प्रवीण दरेकर, आनंदराव गोळे आणि प्रसाद लाड यांच्याविरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे या तिघांची संचालकपदी बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. उर्वरित 18 उमेदवारांचीही बिनविरोध निवड व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: मुंबई सहकारी बँकेवर सहकार मंत्रालयाने भाजप नेते प्रवीण दरेकर यांना पाठवली नोटीस
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here