हिंगोली : आज जवळपास प्रत्येकाच्या घरामध्ये धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी हरभरा, हळद, गहू, इतर धान्य कीटकापासून सुरक्षित ठेवण्यासाठी विषारी औषधी किंवा गोळ्यांचा वापर केला जात आहे. सुरक्षितपणे वापर करता नाही आला तर मात्र हे जीवावर बेतू शकतं हे आता हिंगोलीच्या घटनेमधून समोर आलं आहे. इथं एका तरुणीसोबत असं काही घडलं जे वाचून तुम्हालाही मोठा धक्का बसेल.
१४ डिसेंबर रोजीच्या सकाळी हा प्रकार घडला. डोके दुखण्याची गोळी समजून धान्यात टाकण्याच्या विषारी गोळ्या तिने प्राशन केल्या. यानंतर तिची प्रकृती खालावल्याने तिला तातडीने हिंगोली येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण तिचा यामध्ये मृत्यू झाला. हा सर्व प्रकार अनावधानाने घडल्याचं समजतं. हिंगोली पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, असा प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.