त्यांच्या विचारसरणीत स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जातो. त्यामुळे महाराष्ट्र नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना कधीही खपवून घेणार नाही, अशी टीका अतुल लोंढे यांनी केली.

Chandrakant Patil

चंद्रकांत पाटील आणि नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांना क्षुद्र म्हणून राज्याभिषेक नाकारणाऱ्या विचारसरणीचे आहेत

हायलाइट्स:

  • तिकीट हे पक्षाचे असते. व्होटबँक पक्षाची असते. व्होटबँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते
  • हिंदुत्वाची व्होटबँक ही संत, महंत आणि शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचते
  • शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची भूमिका घेऊन व्होटबँक डेव्हलप केली

मुंबई : शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात हिंदुत्वाची व्होटबँक विकसित केली, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी कळस चढवला, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरुन टीकेचे मोहोळ उठले आहे. या वक्तव्यावरुन काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर आगपाखड केली आहे. चंद्रकांत पाटील आणि नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांना क्षुद्र म्हणून राज्याभिषेक नाकारणाऱ्या विचारसरणीचे आहेत. महाराजांचे राज्य जातीपाती, धर्माच्या पलीकडले होते, स्त्री सन्मान करणारे रयतेचे राज्य होते, असे अतुल लोंढे यांनी म्हटले.

याउलट नरेंद्र मोदी हे मुठभर लोकांना राष्ट्राची संपत्ती विकणारे आहेत. त्यांनी देशातील ८० कोटीपेक्षा जास्त लोकांना दारिद्य्ररेषेखाली नेले. त्यांच्या विचारसरणीत स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जातो. त्यामुळे महाराष्ट्र नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना कधीही खपवून घेणार नाही, अशी टीका अतुल लोंढे यांनी केली.
‘देशाच्या राजकारणात जायचं असेल तर आधी घराच्या बाहेर पडावं लागतं’
चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केले होते. यावेळी त्यांनी उमेदवारांच्या निवडणूक तिकीटाबाबत भाष्य केले. तिकीट हे पक्षाचे असते. व्होटबँक पक्षाची असते. व्होटबँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते. हिंदुत्वाची व्होटबँक ही संत, महंत आणि शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचते. शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची भूमिका घेऊन व्होटबँक डेव्हलप केली. त्याच्यावर अलीकडच्या काळात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या नेत्यांनी कळस चढवला, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.
एकेकाळी लाल गहू मागणारा भारत आज मोदींमुळं लस निर्यात करतोय: चंद्रकांत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीही यावरुन चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. कोणीही या वक्तव्याचं समर्थन करु शकत नाही. चंद्रकांत पाटील यांना इतिहासाची किती माहिती आहे हे तपासून पाहिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू समाजापुरतं मर्यादित ठेवण्याचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही महाराज हिंदूंची व्होट बँक वाटतात, त्यामुळे भाजपाला वाटणंही स्वाभाविक आहे, असे मिटकरी यांनी म्हटले.

Chandrakant Patil

चंद्रकांत पाटील आणि नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांना क्षुद्र म्हणून राज्याभिषेक नाकारणाऱ्या विचारसरणीचे आहेत

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: chhatrapati shivaji maharaj develop hindutva vote bank and pm modi put a spire on that says bjp leader chandrakant patil
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here