अॅडलेड: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अ‍ॅशेस मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव झालाय. जो रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ सध्या दुसऱ्या कसोटी सामन्याची तयारी करत आहे. ही कसोटी १६ डिसेंबरपासून एडिलेट येथे होणार आहे. दुसरी कसोटी डे नाईट असून ती पिंक बॉलने खेळवली जाईल.

वाचा-

पिंक बॉल कसोटीच्या आधी जो रूट मंगळवारी नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत होता. हा सराव सुरू असताना अशी एक घटना घडली ज्यामुळे सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. सराव सत्रात बेन स्टोक्सचा एक बाउंसर चेंडू रुटच्या हेल्मेटला लागला.

वाचा-

सराव करत असताना ऑलराउंडर स्टोक्सने एक शॉर्ट पिच चेंडू हिट करण्याचा प्रयत्नात रुट चुकला आणि तो त्याच्या हेल्मेटला लागला. पण त्यानंतर रुटने जी प्रतिक्रिया दिली त्यावरून त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही हे लक्षात आले. या घटनेनंतर रुट फलंदाजीचा सराव करत होता. दुसऱ्या कसोटीसाठी रुट जोरदार तयारी करत आहे. इंग्लंडच्या खेळाडूंपैकी नेट्समध्ये सर्वात शेवटपर्यंत तोच सराव करत होता.

वाचा-

पहिल्या कसोटीत स्टोक्सला दुखापत झाली होती. तेव्हा त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. आता पिंक बॉल कसोटीमध्ये स्टोक्सकडून काही तरी चांगल्या कामगिरीची अपेक्षा असले. सरावामध्ये स्टोक्स ज्या पद्धतीने गोलंदाजी करत होता त्यावरून दुसऱ्या कसोटीत नक्कीच त्याचा अंतिम ११ मध्ये समावेश केला जाईल असे दिसते. पिंक बॉल कसोटीत इंग्लंडची पुन्हा एकदा परीक्षा असेल. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढला असल्याने दुसऱ्या कसोटीत देखील ते आक्रमक असतील.

पहिल्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव फक्त १४७ धावात संपुष्टात आला होता. दुसऱ्या डावात त्यांनी २९७ धावा केल्या, पण ऑस्ट्रेलियाने ९ विकेटनी बाजी मारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here