चंद्रपूर : ‘इश्क और जंग मे सब जायज है’ असं म्हटलं जातं. जंग युध्दभुमीवरील असो की राजकीय आखाड्यातील. नात्यांना येथे मोल नाहीच. पोंभुर्णा नगर पंचायतीच्या निवडणुकीत दोन सख्या जावांत थेट लढत होत आहे. कोरपणा इथे काकाच्या विरोधात पुतण्याने दंड थोपटले तर गोंडपिपरीत मैत्री फिकी पडली. आजपासून प्रचाराचा धुरळा उडणार आहे. इतकंच नाहीतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही सूसाट सूटणार आहेत. मात्र, या राजकीय आखाड्यात रक्ताच्या नात्यांची परीक्षा आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील सहा नगर पंचायातेतील निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. आजपासून प्रचाराचा तोफा धडकणार आहेत. भाजप, काँग्रेस-शिवसेना, राष्ट्रवादी, वंचितने आपआपले उमेदवार रिंगणात उतरविले. तर अपक्ष उमेदवारांची संख्याही मोठी आहे. या निवडणुकीत पोंभुर्णा आणि कोरपना येथील दोन लढतीने मात्र जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. पोंभुर्णा नगर पंचायत निवडणुकीत दोन जावांत थेट लढत होत आहे. प्रभाग क्र.१५ आणि १६ मध्ये ही लढत होते आहे. ‘मला कोणाचे वैयक्तिक घोटाळे काढायचे नाही तर…’, किरीट सोमय्यांवर राज ठाकरेंची बोचरी टीका प्रभाग क्रमांक पंधरामध्ये काँग्रेसचे उमेदवार आशा विजय मानकर उभ्या आहेत. तर याच प्रभागात त्यांच्या लहान जावू हर्शमिना सूनिल मानकर राष्ट्रवादीचा उमेदवार आहेत. प्रभाग १६ मध्ये वैशाली कृष्णा वासलवार या भाजपच्या उमेदवार आहेत. तर याच प्रभागात त्यांची जावू रामेश्वरी गणेश वासलवार या शिवसेनेच्या उमेदवार आहेत.
काकाच्या विरोधात पुतणा
कोरपनात काँग्रेसची एक हाती सत्ता आहे. काँग्रेसचा सत्तेला सूरूंग लावण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटनेने एकत्र येत आघाडी उघडली. प्रभाग तीनमध्ये होणाऱ्या लढतीकडे मात्र शहरवासीयांचे लक्ष आहे. काँग्रेसचे नितीन बावणे प्रभाग तीनमधून उभे आहेत. तर त्यांचे काका किशोर बावणे भाजप आघाडीचे याच प्रभागातील उमेदवार आहेत.