औरंगाबाद : देशभरात करोना लसीकरण मोहीम जोरात सुरू असताना औरंगाबादमध्ये मात्र लसीकरण घोटाळा समोर आला आहे. कुठं लसीकरण न करता सर्टिफिकेट मिळत आहे तर कुठं लस घेण्यासाठी गेलेल्या लोकांच्या नावावर दुसऱ्यांनीच लस घेतल्याचं समोर आलं आहे, काय आहे नेमका गोंधळ पाहूयात….

औरंगाबाद जिल्ह्यातील शेख कदिर यांनी राज्यात पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता आणि जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या कठोर नियम पाहता त्यांनी १५ नोव्हेंबरला कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतला तर दुसऱ्या डोसची कालावधी आल्याने पुन्हा दुसरा डोस घेण्यासाठी बिडकीन शासकीय रुग्णालयात धाव घेतली. पण जे झालं ते पाहून त्यांना धक्काच बसला.

‘मला कोणाचे वैयक्तिक घोटाळे काढायचे नाही तर…’, किरीट सोमय्यांवर राज ठाकरेंची बोचरी टीका
आता लसीकरण घेण्यासाठी जावूनही लस मिळत नाही तर दुसरीकडे लसीकरण न करताच लसीकरण केल्याचं सर्टिफिकेट मिळत आहे. औरंगाबादच्या जिन्सी पोलिसांनी अशाच बोगस सर्टिफिकेट बनवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या लसीकरण घोटाळ्यात खुद्द आरोग्य कर्मचारीसुद्धा सहभागी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाचा औरंगाबाद पॅटर्न चर्चेत आहे. मात्र, वाढती लसीकरणाची टक्केवारी आणि औरंगाबाद पॅटर्न यावरच आता प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. अशात लोकांच्या जीवालाही याने धोका निर्माण होऊ शकतो.

बापरे! डोकेदुखीच्या समजून खाल्ल्या विषारी गोळ्या, २३ वर्षीय तरुणीसोबत जे घडलं त्याने डॉक्टरही हादरले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here